Shiv Sena UBT : पुण्यात ठाकरेंचे शिलेदार अडचणीत, माजी आमदारासह ३७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, कारण काय?

Shiv Sena UBT leader Vasant More : पुण्यात कात्रज कोंढवा रस्त्यावर विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी वसंत मोरे आणि त्यांच्या ३७ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून कारवाई झाली असून या आंदोलनावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Vasant More News
Vasant More Saam tv
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

fir filed against vasant more for unauthorized protest in pune : पुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते आणि माजी आमदार वसंत मोरे यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावरील बस स्थानकावर विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी मोरे यांच्या सह 37 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (political protest without permission lands shiv sena leader in legal issue)

Vasant More News
Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार हादरे, साखरझोपेत असताना जमीन हादरली, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी आमदार वसंत मोरे आणि त्यांच्या ३७ साथीदारांचच्या विरोधात आज भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसंत मोरे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'स्टंटबाजी बंद करा', 'कात्रज कोंढवा रस्ता' पूर्ण करा, असे फलक वंसत मोरे यांच्या मोर्च्यामध्ये दिसले होते. पुणे महापालिकेच्या ताब्यातील जागेचे पैसे कुणाला दिले. कात्रज चौकाचा दिखावा बंद करा, कात्रज कोंढवा रोड पूर्ण करा अशी घोषणाबाजीही यावेळी वंसते मोरे आणि कार्यकर्त्यांनी केली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vasant More News
Weather Update : मुंबईमध्ये 'मुसळधारे'चा इशारा, कोकणातही कोसळधारा, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी करण्यासाठी मनपाचे अधिकारी आले होते. त्यावेळी यावेळी आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे यांनी समर्थकासह मोर्चा काढून घोषणाबाजी केली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी कठोर कारवाई केली असून वसंत मोरे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Vasant More News
संतापजनक! IIT कॅम्पसमध्ये २० वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, फूड कोर्ट चालवणाऱ्याला बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com