Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

मखाना स्मूदी

घरच्या घरी सहज तयार होणारी मखाना-फ्रूट स्मूदी ही पौष्टिक, पोटभरणारी आणि आरोग्यदायी पर्याय ठरत आहे. मखाना, शेंगदाणे, ताजी फळं आणि चिया सीड्समुळे ही स्मूदी शरीराला आवश्यक प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स देते.

makhana smoothie recipe

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त

मखाना आणि चिया सीड्समध्ये फायबर जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे अनावश्यक खाणे टाळण्यास मदत होते.

fox nut smoothie

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

मखान्यात कमी फॅट आणि कमी सोडियम असते. शेंगदाणे व बदामातील हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

fox nut smoothie

मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा

बदाम, काजू आणि शेंगदाण्यांतील ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन ई मेंदूच्या आरोग्यास पोषक ठरतात.

kids protein smoothie

पचन सुधारते

केळी आणि चिया सीड्समधील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

healthy smoothie for children

नैसर्गिक गोडवा

खजूर आणि केळीमुळे साखर न घालता स्मूदीला नैसर्गिक गोडवा मिळतो. त्यामुळे ही डायबेटीस असणाऱ्यांसाठीही नियंत्रित प्रमाणात चांगला पर्याय ठरू शकतो.

healthy smoothie for children

प्रथिनांचा उत्तम स्रोत

दूध, शेंगदाणे आणि मखाना यांच्या मिश्रणामुळे शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात, जे स्नायू बळकट ठेवण्यास मदत करतात.

makhana fruit smoothie

त्वचा आणि केस

अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स त्वचेचा तजेला वाढवतात आणि केसांना पोषण देतात.

makhana fruit smoothie

मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट

ही स्मूदी मुलांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण देते. शाळेला जाण्यापूर्वी ऊर्जा देणारा उत्तम नाश्ता ठरतो.

makhana fruit smoothie

उन्हाळ्यात थंडावा देणारा पर्याय

थंडगार दूध आणि फळांच्या मिश्रणामुळे शरीराला ताजेपणा मिळतो आणि थकवा कमी होतो.

makhana fruit smoothie

NEXT: Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

जाड Eyebrows हव्यात? मग हे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट | google
येथे क्लिक करा