Who Is Bhartruhari Mahtab? Saam Tv
देश विदेश

Who Is Bhartruhari Mahtab: कोण आहेत भर्तृहरी महताब? ज्यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून केलं नियुक्ती

Pro-Tem Speaker of Lok Sabha: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप लोकसभा खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे.

Satish Kengar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे (BJp) लोकसभा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम 95(1) अंतर्गत लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. लोकसभा अध्यक्षाची निवड होईपर्यंत प्रोटेम स्पीकर आपले कर्तव्य बजावतील.

भर्तृहरी महताब हे ओडिशाच्या कटक मतदारसंघातून सात वेळा लोकसभेचे खासदार आहेत. याच वर्षी ओडिशात बिजू जनता दलला (बीजेडी) मोठा धक्का देत, भर्तृहरी महताब यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. महताब यांना संसदेच्या चर्चेतील प्रशंसनीय कामगिरीबद्दल 2017 पासून सलग चार वर्षे 'संसद रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, हंगामी लोकसभा अध्यक्षांना पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलद्वारे मदत केली जाईल. ज्यात काँग्रेस नेते के. सुरेश, द्रमुक नेते टीआर बालू, भाजपचे राधामोहन सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय आहेत.

महताब यांनी लोकसभा निवडणुकीआधी बिजू जनता दल (बीजेडी) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे.

कोण आहेत भर्तृहरी महताब?

प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्षांची नियुक्ती संसदेचे काम सुरळीत चालावे म्हणून तात्पुरता स्वरूपात केली जाते. सामान्यतः ही नियुक्ती जेव्हा नियमित अध्यक्ष किंवा सभापती निवडून आलेले नसतात किंवा काही कारणास्तव ते उपस्थित नसतात तेव्हा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Mixed Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती बनवावी हा प्रश्न पडलाय? मग मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ ट्राय कराच

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT