Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

Marathi Breaking Live Headlines Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अपडेट, टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, सीजेपी, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावरून देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांच्या दुचाकीला कळवण देवळा रस्त्यावर मॅक्सिमो वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सचिन वसावे याचा जागीच मृत्यू झाला, तर विश्वजीत वसावे रा धानोरा गंभीर जखमी झाला. विश्वजीतला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

० टोरांटो प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या वृक्ष तोडी विरोधात ठाकरे गटाने घेतली आक्रमक भुमीका

० प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी धडक देत वृक्षतोड थांबवली

० वृक्षतोडीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी करीत दिली प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी धडक

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे संध्याकाळी कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डंपर पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या बंबाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत डंपरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र भीषण आगीने रौद्र रूप धारण केल्याने डंपर आगीत जाळून खाक झाला. दरम्यान या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : बसस्थानक परिसरात रिक्षा भाड्यावरून दोन परप्रांतीय कामगारांत तुंबळ हाणामारी

रिक्षा भाड्याच्या पैशांवरून झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन बसस्थानक परिसरात घडली. दोन परप्रांतीय कामगारांमध्ये रिक्षा भाडे देण्यावरून वाद झाला. त्यानंतर मारामारी सुरू झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे दोन कामगार कुठले आहेत, नेमका रिक्षा भाड्याचा वाद कसा झाला याचा तपशील पुढे आला नाही.

साहिल वाकोडेच्या न्यायासाठी आंदोलन

दादर चैत्यभूमी या ठिकाणी पुन्हा विद्यार्थी जमायला सुरुवात

अमरावतीत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव सोहळ्याला सुरवात...

अमरावतीच्या नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात विजयादशमी उत्सवाचा मुख्य सोहळा..

यावेळी अमरावती शहरातून RSS स्वयंसेवकांच पथसंचलन संपन्न...

दोन हजार RSS चे गणवेश धारी स्वयंसेवक पथसंचलनात झाले होते सहभागी...

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल पेस्टिसाइड्स अँड केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत श्रीराव उपस्थित राहणार आहेत.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-संपर्क प्रमुख भारत भूषण (दिल्ली) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत...

मुख्य सोहळ्यात हजारो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नागरिक, महिला उपस्थित...

या आरएसएसच्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील गणमान्य उपस्थित...

आदित्य ठाकरे उद्या कर्जतला जाणार

आदित्य ठाकरे उद्या कर्जतला जाणार

कर्जत ते भीमाशंकर या पट्ट्यात टोरंट हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जंगलतोडीची पाहणी करणार

आज स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली

राज ठाकरे यांची २७ ऑक्टोबरला कर्जतला सभा घेणार आहेत

कोजागिरी पोर्णिमे निमित्ताने श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज

पारंपरिक पोषाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. प्रथा-परंपरेनुसार मातेचा साजशृंगार करण्यात आला असून, अलंकारांनी सजलेले श्री. विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. रुक्मिणी मातेला सोन्याचे मुकुट, खाड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, ठूशी, सोन्यामोत्याचे ताणवाड जोड, चंद्र, सूर्य, मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, लक्ष्मीहार, पुतळ्यांची माळ, तारा मंडळ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

बारामती मध्ये सूर्यवंशी याच्यावर झालेल्या "कथित हल्ला" प्रकरणात चौकशी पूर्वीच राणा पसार

राणा शिपिंग कंपनी चा चालक व व्यावसायिक राणा सूर्यवंशी हा पोलिसांच्या पुढील चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून धूम ठोकून पसार

त्याच्या शोधासाठी काही पोलिसांनी फिरवली चक्रे

हल्ला प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर व साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल

१८ ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती

टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर येथे सुरू असलेली वृक्षतोड ही कर्जत तालुक्यातील उबाठा शिवसेना यांनी आज बंद पाडत जंगलाची कत्तल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जंगला बाहेर काढले.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि वन कर्मचारी तैनात होते.शंभर वर्षाहून अधिक वयाचे वृक्ष तोडण्यात आल्याने उबाठा शिवसेनेने संताप व्यक्त केलाय.

दादर चैत्यभूमी कॅण्डल मार्च करणाऱ्या विद्यार्थींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

परभणीतील कचरा डेपोला भीषण आग; ११ अग्निशमन गाड्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न

परभणीच्या गंगाखेड महामार्गावरील बोरवंड शिवारातील महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आज सकाळी आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून, शेतशिवारात सर्वत्र धूर दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवळपास ११ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक तासांनंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तेजस ठाकरे यांच्याकडून नव्या गोगलगायीचा शोध

तेजस ठाकरे यांच्याकडून नव्या गोगलगायीचा शोध

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी नगर परिसरात सूक्ष्म गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला

‘डिकॅरॅक्स तिलारिएन्सिस’ (Dicharax tilariensis) असे या नव्या प्रजातीचे शास्त्रीय नाव असून, तिला ‘तिलारी मायक्रो-स्नेल’ म्हणूनही ओळखले जाते

ही प्रजाती तिलारी नगर येथील अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळते

उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिसरातून नोंदवण्यात आलेली Dicharax या वंशातील ही दुसरी प्रजाती आहे

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या नावावरून या प्रजातीला नाव देण्यात आले आहे

समुद्रसपाटीपासून सुमारे ७३० ते ७४० मीटर उंचीवर या प्रजातीचा शोध लागला.

या नव्या प्रजातीविषयीचे संशोधन ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ (Journal of Conchology) या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे

पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी लवकरच नियमावली

पुणे शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, शहरातील काही जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर सुरू असल्याचं समोर आलं आहे. याची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी संबंधित आस्थापनांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. उद्या पुणे महापालिकेकडून स्विमिंग पूल आणि वॉशिंग सेंटरसाठी नवीन नियमावली जाहीर होणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी नियमावली लवकरच, आदेश न पाळल्यास कारवाई

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली असली, तरी शहरातील जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर अद्यापही सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने संबधित आस्थापनांना नोटीस देऊन कारवाई करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

टायगर श्रॉफच्या जुहू येथील गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील ११वा आरोपी प्रांजल ठकरानला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई आणि इंदूर क्राइम ब्रँचने संयुक्त कारवाई करत प्रांजलला इंदूरमधील रुग्णालयातून ताब्यात घेतले.

उद्या शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा अकोले ते मुंबई वाहन लाँगमार्च 

शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या विविध प्रश्नांसंदर्भात उद्या शेतकऱ्यांचा वतीने अकोले ते मुंबई असा लाँगमार्च निघणार आहे. किसान सभेच्या वतीने 22 ऑक्टोबर पासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे महामुक्काम आंदोलन सुरू आहे.. सरकारने दखल न घेतल्याने उद्या 26 ऑक्टोबर रोजी शेतकरी आणि लाडक्या बहिणी शेकडो वाहनांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे कूच करणार आहेत.

जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य 

ज्वेलरी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा भास होत असल्याचे वक्तव्य नेत्यांनी केले. आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, असेही त्यांनी नमूद केले. देशातील ५० लाखांहून अधिक कारागीर जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाशी जोडले गेले असून, या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे.

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढती पाणीटंचाई यावर तातडीनं उपाययोजना आखण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार च्या गोष्टी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला आमदार नाना पटोले वगळता सर्वच आमदार उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतात दुष्काळ निवारणावर असलेल्या आढावा बैठकीदरम्यान भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतानाचा चित्र बघायला मिळालं.

किनगावमध्ये पथसंचलनाला विरोध पोलिसांचा लाठीचार्ज |RSS Path Sanchalan |Dussehra Rally Dispute |

किनगावमध्ये दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला एका गटाने विरोध केला... यामुळे तीव्र तणाव निर्माण झाला होता... धार्मिक स्थळासमोरून रॅली नेण्यास विरोध करण्यात आला होता... यासाठी महिलांनी ठिय्या मांडत दगडफेक केलं... तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला...

सामाईक विहिरीच्या पाण्यावरून दुहेरी हत्याकांड; पुतण्याने काका-काकूला संपवलं!

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील सामाईक विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतीच्या वादातून पुतण्याने काका आणि काकूवर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात त्र्यंबक चोपडे आणि मंगलाबाई चोपडे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपी देवेंद्र चोपडे याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण औंढा नागनाथ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आदिवासी विद्यार्थी शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार 

आज आदिवासी विद्यार्थी शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार आहेत

मात्र पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस शिवाजी पार्क येथे आलेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत आहेत

आम्ही आदिवासी आंदोलक नाही असं सांगत असताना देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं

बांगलादेशला नमवत भारताची सुवर्णभरारी! हँडबॉल संघाच्या विजयात पुण्याच्या प्रशिक्षकाचा सिंहाचा वाटा!

बांगलादेश येथे झालेल्या बेगम खलिदा जिया आयएचएफ नेशन ट्रॉफी एशिया झोन टू च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला 28/16 असा पराभव करून दणदणीत विजय संपादन केला. या यशामध्ये पुण्याच्या उषा ढमाळ यांचा मोठा वाटा आहे कारण भारतीय हँडबॉल संघाच्या त्या प्रशिक्षिका आहेत. हँडबॉल संघाच्या प्रशिक्षका उषाताई ढमाळ यांनी आपल्या संघाच्या कौतुकावर बोलताना स्पष्ट केले की संघातील खेळाडूंना आत्मविश्वास जागवणे ,संघ भावना दृढ करणे, सातत्याने डावपेच प्रोत्साहन देणे, विजयासाठी असलेली जिद्द व शिस्त निर्माण करणे हे एका प्रशिक्षकाचे खरे सामर्थ्य असते. या विजयी झालेल्या खेळाडूंवर महाराष्ट्र राज्य हँडबॉल तसेच जिल्हास्तरावरील हँडबॉल खेळाडूंनी अभिनंदन केलेले आहे व पुढील यशाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले...

सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भरला किन्नरांचा मेळावा,छबिना मिरवणूकीला सुरुवात

नाशिकच्या सप्तश्रृंग गडावर आज कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने दरवर्षी प्रमाणे राज्यातील किन्नरांचे आखाडे देवीचा छबिना घेऊन दाखल झाले आहे.किन्नरांच्या विविध आखाड्यां मधिल किन्नर व त्यांचे गुरु भवानी तलावावर जाऊन देवीच्या मुर्तीला स्नान करुन त्यांची पुजा करत देवीचा छबिना डोक्यालर घेत त्यांची वाद्याच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात होते.यात किन्नरांसह त्यांचे आखाड्यातील अनेक जण सहभागी होतात.

‘नैना’ला विरोधाचा नव्हे, विकासाचा चेहरा देणार; भूमिपुत्र लाभार्थी नव्हे तर विकासाचे भागीदार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैना परिसरातील प्रलंबित प्रश्नांना गती देत नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकास करण्याचा महायुती सरकारचा निर्धार असून, भूमिपुत्रांना विकासाचे केवळ लाभार्थी न ठेवता भागीदार केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सिडकोच्या माध्यमातून नैना क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ, जमीनधारकांना मालमत्ता पत्रकांचे वितरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाच्या मार्गांचे तसेच उरण बाह्यवळण मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे पनवेल-उरण-नैना पट्ट्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग आणि नव्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे हा परिसर भविष्यातील ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम मोडाल तर सावधान, आरटीओची आता ड्रोनद्वारे राहणार नजर

वाहतुकीचे नियम मोडाल तर सावधान ! अकोला आरटीओची आता ड्रोनद्वारे राहणार नजर... आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर आता कारवाईचा इशारा...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर अकोल्यातील आरटीओ ने ड्रोनद्वारे कारवाई करणार आहे.. राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे अकोला आरटीओ प्रथम ठरले आहे.. आरटीओ रवींद्र भुयार यांच्या संकल्पनेतून ड्रोन द्वारे कारवाईची संकल्पना हि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि अपघात टळावेत, यासाठी आहे.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गावर धावणाऱ्या वाहनावर ड्रोन द्वारे नजर ठेवणार आहे...

कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

कर्जत आणि भीमाशंकर परिसरात टोरंट प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही वृक्षतोड तातडीने थांबवावी, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. पर्यावरणाचे सर्व निकष पाळूनच प्रकल्प उभारावा, अशीही त्यांची मागणी आहे.

या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता असून, मागण्या मान्य न झाल्यास पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शेकापने दिला आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी प्रांजल ठकरान; आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील ११वा आरोपी प्रांजल ठकरान याला आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. २२ वर्षीय प्रांजलला मुंबई आणि इंदूर क्राइम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत इंदूरमधील रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले. उपचार घेत असलेल्या भावाला भेटण्यासाठी तो इंदूरला गेला होता.

१८ ऑक्टोबर रोजी जुहू येथे टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला होता. या गोळीबारासाठी वापरण्यात आलेली देशी बनावटीची पिस्तुले अर्थात कट्टे पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच, आरोपींना आर्थिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल मदत केल्याचाही संशय आहे.

हरियाणातील सोनीपतचा रहिवासी असलेला प्रांजल ठकरान इंजिनिअरिंग पदवीधर आहे. हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेल्या गँग नेटवर्कशी संबंधित हँडलर्सच्या संपर्कात तो होता का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

‘ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचे पडद्यामागे प्लॅनिंग सुरू’; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “समाजाचे इमानदारीने काम करणं किती घातक आहे, हे राज्याला कळलं पाहिजे. आपलेच लोक, आपलेच सरकार किती त्रास देतं. इमानदार माणसाला संकटाचा सामना करावा लागतो. मी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवला आहे. ऑडिओ क्लिपची माहिती समोर येईल.”

“माझ्या कानावर कुजबुज आली आहे की, पडद्यामागे प्लॅनिंग सुरू आहे. ही क्लिप काहीही करून खोटी ठरवायची, असे नियोजन सुरू आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या क्लिपच्या खोलात जातील, असा मला विश्वास आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होणं शिंदे साहेबांसाठी खूप गरजेचं आहे. हे खूप मोठं षड्यंत्र आहे. सत्तेत राहण्यासाठी यांना एकमेकांना वाचवायचं आहे का?” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

टोरंट हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी जंगलतोड; स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञांची राज ठाकरेंशी भेट

कर्जत ते भीमाशंकर या पट्ट्यात टोरंट हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी जंगलतोड केली जात आहे. या जंगलतोडीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञ आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली.

‘आम्हाला अर्थखातंच पाहिजे’; छगन भुजबळ यांची स्पष्ट भूमिका

छगन भुजबळ म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेलो होतो. आमच्याकडे असलेले अर्थखाते आम्हाला लवकरात लवकर दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याकडे अधिक लक्ष देत आहोत. मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा किंवा दुसरा कोणताही अजेंडा आमचा नाही. आमची भूमिका केवळ मागणी करण्याची आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला अर्थखाते द्यायचे आहे.”

“आम्हाला अर्थखातंच पाहिजे आहे. आपल्या शेतकऱ्यांना तयार करायचे आहे आणि त्यासाठी मोठी रक्कम उभी करायची आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असतानाही नवीन जागा आल्या की असे बदल होत असत. मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा बदल कधी होईल, हे फक्त मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे,” असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. मंत्री बदलण्याबाबत सध्या काहीही ठरलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील रिसॉर्टमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १३ महिलांची सुटका

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून १३ महिलांची सुटका केली आहे. मुंबई, पुण्यासह दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील या महिला असल्याची माहिती आहे. या रिसॉर्टमध्ये १,००० रुपयांत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. रॅकेटचा म्होरक्या फरार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, गुरुवारी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांचीही बैठक झाली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊपैकी पाच मंत्र्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना सुनेत्रा पवार संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांची साडेअकरा वाजता तातडीची पत्रकार परिषद

ऑडिओ बॉम्बनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज तातडीच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

आरोपींच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची नऊ पथके रवाना; सामच्या बातमीनंतर हालचालींना वेग

नांदेडमधील खालसा या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फायनान्स कंपनीच्या चालकासह इतर काही जणांवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची नऊ पथके रवाना झाली असून, सामच्या बातमीनंतर आरोपींना पकडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग; ३१ ऑक्टोबरपूर्वी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, ३१ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी आवश्यक मान्यता मिळविण्याकरिता विभागीय सहनिबंधकांकडून सहकार प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा आहे.

प्राधिकरणाची मान्यता मिळताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणे, संभाव्य उमेदवारांची रणनीती आणि पॅनेलच्या राजकारणाला लवकरच वेग येण्याची चिन्हे आहेत. आता सहकार प्राधिकरणाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किसान सभेच्या लाँगमार्चपूर्वी अजित नवले आणि आंदोलकांना पोलिसांची नोटीस

शेतकरी, महिला आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी २६ ऑक्टोबरला मुंबईतील वर्षा बंगल्यावर लाँगमार्च काढण्याचा इशारा देत किसान सभेने महामुक्काम आंदोलन सुरू केले आहे. २२ ऑक्टोबरपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून, २६ ऑक्टोबरला ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांसह आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मलबार हिल पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आता अकोले पोलिसांनीही आंदोलकांना नोटीस दिली आहे. मुंबईच्या दिशेने लाँगमार्च काढू नये, अशी सूचना करत पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत. मात्र, कितीही दबाव आणला तरी लाँगमार्च निघणारच, असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.

Nashik : जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

नाशिक मुंबई महामार्गावर जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

या घाटात एक अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे

यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

महामार्ग पोलिस व आपत्ती व्यवस्थापन सदस्य घटनास्थळी दाखल अवजड वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

मच्छिमारांची कारवाईसाठी मत्स्य विभागावर धडक

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर

‘गोल्डन बनियन अवॉर्ड’साठी गुलदार प्रकल्पाची निवड

“द वीक हेरिटेज अवॉर्ड्स २०२६’मध्ये दोन श्रेणींत नामांकन

पहाटेच्या सुमारास वाकड परिसरातील सहा सात दुकानांना लागली भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आज सकाळी पहाटे जवळपास सहा सात दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

वाकड परिसरातील प्रीष्टीन ब्रो लाईफ या ठिकाणी सहा सात दुकानांना आग लागल्याची वर्दी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे.

Konkan Rain Update : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे.

वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कापणीला आलेली भातशेती आडवी झाली आहे.

तसेच अनेक भागात झाडे मोडून पडली तर काही टीकाणी घरांची छप्पर उडून गेली आहेत.

कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तीन तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे.

या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका याच तीन तालुक्यांना बसला असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये ‘आनंदकुंभ’ संत संमेलन; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत-महंतांचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये ‘आनंदकुंभ’ संत संमेलन; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत-महंतांचे पूजन

१३ आखाड्यांचे प्रमुख संत, महंत, महामंडलेश्वर राहणार उपस्थित; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीवर होणार संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कोर कमिटीची आज बैठक..

थोड्याच वेळात कोर कमिटीच्या बैठकीला होणार सुरुवात..

पक्षातील प्रमुख नेते कोर कमिटीच्या बैठकीला राहणार उपस्थि

Buldhana Drought : बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन बैठक

बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन बैठक...

उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला निर्देश

धरणांमधील पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी महत्वाच्या सूचना ..

Satara : फलटणमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्याला क्लासमध्ये मारहाण; शिक्षिका आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा

फलटणमध्ये खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाला शिक्षिकेसह नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी खेळण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

Mumbai : मुंबईकरांची सकाळ होतेय धुरक्यांच्या चादरीत

मुंबईकरांची सकाळ होतेय धुरक्यांच्या चादरीत

वाढत्या वायुप्रदूषणामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली असून, AQI १९७ वर पोहोचला आहे.

वाहनांचा धूर आणि बांधकामांमधील धुळीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती आहे.

अशातच मुंबईकरांना मोकळा श्वास कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Pune : कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

कोजागरी पौर्णिमा निमित्त पुणे शहरातील उद्याने आज रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

उद्यान विभागाचा पुणेकरांच्या हितार्थ निर्णय

आज कोजागरीच्या निमित्ताने चांदण्याच्या प्रकाशात आनंद लुटता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

या आधी रात्री ७.३० वाजता उद्यान बंद असायची मात्र आज १२ पर्यंत असणार उद्यान सुरू

संध्याकाळी ४ ते १२ अशी उद्यान सुरू असणार आहेत

Nagpur : नागपूर महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचे पाणी बचतीसाठी निर्देश

- महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचे पाणी बचतीसाठी निर्देश.

- पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांची तपासणी केली जाणार...

- कार धुणे, रस्ते धुणे, बागकाम आणि बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

काँग्रेस पक्ष सोडलेले देशातील पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करणार?

काँग्रेस पक्ष सोडलेले पक्षाचे देशातील पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये 'घरवापसी' करण्याची चर्चा सुरूये.

त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा सुरूये.

यावर मोठं विधान करतांना नाना पटोले यांनी चव्हाण यांच्या संदर्भात राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात मोठा राग असल्याचं म्हणालेये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.