Shreya Maskar
दिवाळी म्हटलं की चकली, चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि लाडू असे चविष्ट फराळाचे पदार्थ घरोघरी बनवले जातात. मात्र, हे पदार्थ बनवताना तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुम्हाला तेलाचा वापर टाळायचा असेल, तर काही सोप्या ट्रिक्स वापरा.
चकलीची भाजणी वापरून पीठ मळा आणि चकल्या तयार करा. त्या एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक करून पाहा. यामुळे डीप फ्राय करण्यासाठी लागणारे तेल टाळता येते.
पातळ पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यात कोरडे भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, कढीपत्ता आणि मसाले मिसळा. अशा प्रकारे तेल न वापरताही चिवडा बनवता येतो.
गव्हाचे पीठ किंवा मैदा, साखर आणि आवश्यकतेनुसार दूध किंवा पाणी वापरून पीठ तयार करा. त्याचे तुकडे करून ओव्हनमध्ये बेक करा. योग्य तापमान आणि वेळ ठेवल्यास शंकरपाळी कुरकुरीत होऊ शकते.
करंजीच्या सारणासाठी सुके खोबरे, खसखस, सुकामेवा आणि गूळ वापरा. सारण भरून करंज्या व्यवस्थित बंद करा आणि ओव्हनमध्ये बेक करा. बेक केलेल्या करंजीचा पोत तळलेल्या करंजीपेक्षा वेगळा असतो.
तेलाशिवाय फराळ बनवताना जिरे, ओवा, हळद, तिखट, कढीपत्ता आणि कोथिंबीर यांचा योग्य वापर करा. त्यामुळे पदार्थांना छान चव आणि सुगंध मिळतो. चिवड्यासारख्या पदार्थांसाठी मसाले कोरडे भाजून वापरता येतात.
एअर फ्रायर, ओव्हन, जाड बुडाची कढई आणि नॉन-स्टिक तवा यांचा वापर करून तेलाशिवाय फराळाचे अनेक पदार्थ तयार करता येतात. प्रत्येक पदार्थासाठी योग्य तापमान आणि शिजवण्याची पद्धत निवडा.
दिवाळीचे पदार्थ खाल्ल्यावर त्यावर पाणी पिणे टाळा, नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.