Diwali Karanji Recipe : खुसखुशीत करंजी बनवण्याची सोपी रेसिपी, दिवाळी फराळाची वाढेल रंगत

Shreya Maskar

दिवाळी फराळ

दिवाळी म्हटलं की फराळाच्या ताटात चकली, लाडू, चिवडा आणि खुसखुशीत करंजी हवीच! बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोडसर खोबऱ्याचे सारण असलेली करंजी हा पारंपरिक दिवाळी फराळाचा लोकप्रिय पदार्थ आहे.

Diwali snacks | pinterest

करंजी साहित्य

करंजी बनवण्यासाठी मैदा, तूप, मीठ, पाणी, तेल, सुके खोबरे, पिठीसाखर, खसखस, काजू-बदाम, बेदाणे, वेलची पूड, आणि जायफळ पूड इत्यादी साहित्य लागते.

Karanji | pinterest

सुके खोबरे

करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात सुके खोबरे मंद आचेवर हलके भाजून घ्या. त्यानंतर खसखस, काजू-बदाम आणि बेदाणे घालून थोडे परतून घ्या.

Dried coconut | pinterest

वेलची पूड

हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून व्यवस्थित मिसळा. अशाप्रकारे करंजीचे गोड सारण तयार झाले आहे.

Cardamom powder | pinterest

मैदा

एका भांड्यात मैदा, चिमूटभर मीठ आणि गरम तूप घालून चांगले एकत्र करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ ओल्या कापडाने झाकून २० ते ३० मिनिटे बाजूला ठेवा.

flour | pinterest

करंजीला आकार द्या

पिठाचे छोटे गोळे करून पातळ गोल पुऱ्या लाटा. पुरीच्या मध्यभागी तयार केलेले सारण ठेवा. पुरीच्या कडांना थोडे पाणी लावून अर्धचंद्राकार घडी घाला आणि कडा घट्ट बंद करा. करंजी कटरच्या मदतीने कडा सुंदर आकारात कापून घ्या.

Shape Karanji | pinterest

करंज्या तळून घ्या

कढईत तेल गरम करून मंद आचेवर करंज्या गोल्डन फ्राय करा. तयार करंज्या थोड्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून द्या.

Fry the karajya | pinterest

टीप

पिठात गरम तूप योग्य प्रमाणात घातल्याने करंजीची पारी खुसखुशीत होण्यास मदत होते.करंजीचे पीठ घट्ट मळा. पीठ खूप मऊ असल्यास पारीचा कुरकुरीतपणा कमी होतो.

Note | pinterest

NEXT : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Diwali Ladoo Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...