Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. फराळाला आतापासूनच सुरुवात करा. झटपट होणारे रव्याचे लाडू कसे बनवावे, जाणून घेऊयात.

Diwali | pinterest

रवा लाडू

रवा लाडू बनवण्यासाठी रवा, पिठीसाखर, साजूक तूप, सुके खोबरे, वेलची पूड, काजू, बेदाणे आणि दूध इत्यादी साहित्य लागते.

Rava Ladoo | pinterest

रवा भाजून घ्या

पॅनमध्ये थोडे तूप गरम करून रवा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. रव्याचा छान सुगंध आला की गॅस बंद करा. रवा जळणार नाही याची काळजी घ्या.

Roast the Rava | pinterest

सुकामेवा

त्याच पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्या. खोबरे वापरत असल्यास तेही हलके भाजून घ्या. सर्व पदार्थांचे प्रमाण समान असावे.

Dry Fruits | pinterest

वेलची पूड

भाजलेला रवा थोडा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, सुकामेवा आणि खोबरे घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

Cardamom Powder | pinterest

तूप

मिश्रणात थोडे थोडे कोमट तूप घालून मिक्स करा. हातात मिश्रण घेऊन घट्ट दाबत गोल लाडू वळा. मिश्रण कोरडे असल्यास थोडे तूप आणखी घाला.

Ghee | pinterest

रवा लाडू तयार

तयार लाडू ताटात ठेवून पूर्ण थंड होऊ द्या. त्यानंतर हवाबंद डब्यात साठवा आणि दिवाळीच्या फराळात सर्व्ह करा.

Rava Ladoos are Ready! | pinterest

लाडू कडक होऊ नये म्हणून...

पिठीसाखर वापरल्यास लाडूंचा पोत छान राहतो. रवा मंद आचेवर नीट भाजा. कोमट तूप/दूध वापरून लाडू मऊसूत वळले जातात.

ladoos | pinterest

NEXT : पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? फॉलो करा स्टेप बाय स्टेप 'ही' रेसिपी

Diwali Chakli Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...