Shreya Maskar
दिवाळी म्हटले की, रोषणाई, कंदील, फटाके आणि फराळ आले. यंदा दिवाळीला घरीच सोप्या पद्धतीने कुरकुरीत भाजणी चकली बनवा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.
भाजणी चकली बनवण्यासाठी चकलीची भाजणी, तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ , तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
भाजणी चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजणीचे पीठ तयार करा. एका बाऊलमध्ये चकलीची भाजणी, तीळ, ओवा, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करा.
त्यात गरम तेलाचे मोहन घाला. थोडे थोडे कोमट पाणी घालून मऊ, घट्टसर पीठ मळून घ्या.चकलीच्या साच्यात पीठ भरा. बटर पेपर किंवा ताटावर गोलाकार चकल्या पाडून घ्या.
कढईतील तेल मध्यम गरम करा. चकल्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. चकल्या पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
जास्त मोहन घातल्यास चकल्या तेलात तुटू शकतात. चकली मध्यम आचेवर तळा, जेणेकरून चकली कुरकुरीत होईल.
खूप घट्ट पीठ असल्यास चकली पाडताना तडे जाऊ शकतात. जास्त गरम तेलात चकली बाहेरून पटकन लाल होते, पण आतून नीट कुरकुरीत होत नाही.
तांदळाची चकली, रवा चकली, साबुदाणा चकली, पोह्याची चकली