Sujay Vikhe-Patil VIDEO: भाजपच्या सुजय विखेंना EVMवर शंका, नगरमध्ये 1991 ची पुनरावृत्ती होणार?

Sujay Vikhe-Patil On EVM: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडे उलटले तरी त्यावरुन रंगणारे आरोप प्रत्यारोप, शंका कुशंका सुरुच आहेत. अहमदनगरच्या निकालावर पराभूत उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आलायं.
भाजपच्या सुजय  विखेंना EVMवर शंका, नगरमध्ये 1991 ची पुनरावृत्ती होणार?
Sujay Vikhe-Patil On EVMSaam Tv

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे आपण ही मागणी करत असल्याचा दावा सुजय विखेंनी केलाय. तर सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा असा खोचक टोला नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी लगावलाय. दरम्यान, विखेंच्या या भूमिकेमुळे पुन्हा 90च्या दशकातील विखेंबाबत घडलेला किस्सा चर्चेत आलायं.

नगरमध्ये पुन्हा 1991 ची पुनरावृती?

1991च्या निवडणुकीत यशवंतराव गडाखांना पवारांनी उमेदवारी देत बळ दिलं. त्यामुळे नाराज बाळासाहेब विखे पाटलांना अपक्ष उभं रहावं लागलं.. विखेंच्या पराभव जिव्हारी लागला. त्यांनी निकालाविरोधातच कोर्टात धाव घेतली .सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं तिथे गडाखांची निवड अवैध ठरवण्यात आली. मात्र विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्णयही रद्दबातल ठरला...आता पुन्हा एकदा नगरच्या निवडणुकीचा निकालाला आव्हान देण्यात आलंय.

भाजपच्या सुजय  विखेंना EVMवर शंका, नगरमध्ये 1991 ची पुनरावृत्ती होणार?
VIDEO: वरळीत रंगणार महाभारत! आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री; ठाकरे बंधू आमने-सामने येणार?

यासाठी सुजय विखेंनी EMV आणि VVPAT पुर्नपडताळणीसाठी 18 लाखाचं शुल्क भरलंय. त्यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघांतल्या मतदान केंद्राबाबत पडताळणीची मागणी केलीय, हे जाणून घेऊ.

विखेंना EVMवर शंका

यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5 , कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली.

भाजपच्या सुजय  विखेंना EVMवर शंका, नगरमध्ये 1991 ची पुनरावृत्ती होणार?
Arvind Kejriwal Got Bail: अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा, न्यायालयाचे जामीन केला मंजूर

सुप्रीय कोर्टाचे निर्देश काय ?

  • इव्हीएमवर एखादा उमेदवार आक्षेप घेऊ शकतो

  • संबंधित मतदार संघात 5 टक्के ईव्हीएमची तपासणी होणार.

  • त्यासाठी आक्षेप घेणाऱ्या उमेदवाराने ईव्हीएम पडताळणीचा सगळा खर्च द्यायचा.

  • EVM पडताळणीसाठीची अधिकृत विनंती निकाल जाहीर झाल्याच्या 7 दिवसांत करावी.

अहमगनगरचं राजकारण नेहमीच विखे घराण्याभोवती राहिलंय. भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांना गळाला लावलं. त्यानंतर भाजपच्याच तिकीटावर 2019 मध्ये सुजय विखें पहिल्यांदा खासदार झाले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा 28929 मतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला होता. आता ईव्हीएम पडताळणीत काय निकाल समोर येतो त्यावर दोघांचं भवितव्य अवलंबून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com