Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Marathi Actress Social Media Post : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ताची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिले आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Marathi Actress Social Media Post
Marathi Actress PrajaktaSAAM TV
Published On: 
Summary

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट

कमेंट पाहून नेटकरी संतापले

अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आपली मते परखडपणे मांडतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना टीकेला, ट्रोलिंगचा सामोरे जावे लागते. अशात आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar) सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तिने शेअर केलेली पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन स्क्रीनशॉट आहे. स्क्रीनशॉटमध्ये प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीची कमेंट दिसत आहे. त्यावर प्राजक्ता हनमघरने अभिनेता, लेखक पंकज पंचारियाची पोस्ट रिपोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे.

नेमकी पोस्ट काय?

"पुरुषी संस्कृतीच्या उदात्तीकरणाचा अतिरेक होतो, तेव्हा काँग्रेस-भाजप करत बसायचे का?

खालील पोस्टमध्ये सचिनभाऊ म्हणतात, "प्राजक्त, तू हिजडा आहे." व्याकरणाच्या चुकांवर बोलणे टाळूया. प्राजक्ताच्या विचारधारेचा आदर असला पाहिजे, पण म्हणून तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे योग्य आहे का? 'हिजडा' हा शब्द अरबी 'हिजराह' (वेगळ्या वाटेने प्रवास करणारा) शब्दाचा अपभ्रंश आहे. महाभारतात शिखंडी हा जगातला पहिला किन्नर राजा होता. पण सचिनभाऊ वाचत नाहीत! असो, शेवटी आपला भाऊ आहे, त्याला सांभाळणे आपली जबाबदारी आहे. आपल्या रागासाठी, सचिनभाऊ, तुम्ही कोणत्याही लिंगभावात्मक समुदायाला शिवी म्हणून वापरू शकत नाही; कारण सीमा आनंद (सेक्स थेरपिस्ट) म्हणतात की, जगातला प्रत्येक पुरुष हा उभयलिंगी (Bisexual) असू शकतो.

आता भाऊ, तू म्हणाला की, "ही समलिंगी आहे." अरे सचिनभाऊ, समलिंगी ही शिवी नाही होऊ शकत! ती एक लैंगिक स्थिती (Sex Condition) आहे. कंडिशनला शिवी बनवता येत नाही. तू हुशार नाही म्हणून मी तुला प्रेमाने 'दगड' किंवा 'सुकलेला गु' म्हटले असते, पण तुला राग आला म्हणून मी तुला समलिंगी कसे म्हणू? अजंठा-वेरूळच्या लेण्यांमध्ये तुला समलिंगी शिल्पेही दिसतील. जरा अभ्यास केला की किती मस्त बोलता येते!

L - Lesbian (लेस्बियन)

G - Gay (समलिंगी पुरुष)

B - Bisexual (उभयलिंगी)

T - Transgender (ट्रान्सजेंडर)

Q - Queer (वेगळे - समुदायाने त्याला सन्मानाचा दर्जा दिला.)

A - Asexuality (लैंगिक भावना नसणे - हा आजार नाही, नैसर्गिक भावना आहे.)

I - Intersex (लिंग अस्पष्ट असणाऱ्या व्यक्ती.)

मला शाळेत सेक्स एज्युकेशन शिकवले नाही, पण जगात खूप अभ्यास करता येऊ शकतो. प्राजक्ता ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण विचारांच्या खिडकीतून आमचे विचार वेगळे आहेत. म्हणून तिला चुकीच्या सेक्स भावात नेऊन बसवू नकोस.

समलिंगी असणे हा गुन्हा नाही. विरुद्ध लिंगी असणे ही काही अभिमानास्पद गोष्ट नाही. जर विरुद्ध लिंगी लोकच महान असते, तर बाबा बंगालीकडे गुपचुप जाऊन लिंग ताठरण्याच्या गोळ्या लोक कशाला घ्यायला गेले असते?

सचिनभाऊंसारख्या लोकांमुळे लॉकडाऊनमध्ये ९ समलिंगी लोकांच्या आत्महत्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. सारंग पुणेकर (भारतातली पहिली ट्रान्सजेंडर् जिने पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले) सारखी मैत्रीण सुद्धा आत्महत्येने गेलेली मी पाहिली आहे. मित्रा, असे नका वागू! अक्कल असेल तर समानतेने जगा आणि जगू द्या.

टीप :- मला कोणत्याच राजकीय विचारांशी देणेघेणे नाही. लैंगिक समानता असावी, इतकीच साधी अपेक्षा आहे."

अभिनेत्री वर्कफ्रंट

प्राजक्ता हनमघर मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलसं केले आहे. तिने अनेक मालिका, विनोदी कार्यक्रम, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता हनमघर 'आता थांबायचं नाय!', 'घबाडकुंड', 'अफरातफरी' , 'धुरळा', 'वेडिंगचा शिनेमा', 'एक लग्नाची दुसरी गोष्ट' या चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Marathi Actress Social Media Post
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com