Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; मुख्य अभिनेत्री भावुक, चाहते नाराज

Serial Actress Emotional Post : लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करून मालिकेच्या आठवणींना उजाळा दिलाय.
Serial Actress Emotional Post
Serial Off AirAI PHOTO
Published On: 
Summary

लोकप्रिय मालिका संपली

मुख्य अभिनेत्रीने केली भावुक पोस्ट

मालिका संपणार म्हणून चाहते नाराज

प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकेने निरोप घेतला आहे. मालिकेचा शेवटचा भाग अलिकडेच प्रसारित झाला आहे. ही मालिका दुसरी-तिसरी कोणती नसून एकता कपूरची प्रसिद्ध मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही आहे. या मालिकेत अभिनेत्री स्मृती इराणी मुख्य भूमिकेत झळकल्या. या मालिकेत त्यांनी 'तुलसी विरानी' ही भूमिका साकारली. या मालिकेने प्रेक्षकांना खूप हसवले आणि प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले.

मालिकेच्या संबंधित स्मृती इराणी आणि एकता कपूर यांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात त्यांनी आपल्या भावना मांडून जुन्या- नव्या आठवणींना उजाळा दिला आहे. शूटिंग दरम्यानचे खास क्षण पोस्ट केलेल्या व्हिडीओत दिसत आहेत. या पोस्टला एक खास कॅप्शन देखील देण्यात आले आहे.

स्मृती इराणी पोस्ट

"तो भावनांचा एक कल्लोळच होता. नवीन आठवणी तयार झाल्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आयुष्याच्या परिचित तसेच अनोळखी छटांचा शोध घेणाऱ्या या प्रवासात नवीन अध्याय विणले गेले. हृदय कधीही थकले नाही, मनाने गती ठेवली आणि प्रत्येक वळणाने आत्मा ढवळून गेला. आणि कुठेतरी त्या भावनांच्या सुंदर मंथनात, नॉस्टॅल्जिया आणि नवीन सुरुवात, आम्ही इतिहासाचे छोटे तुकडे तयार केले जे पडदे पडल्यानंतर खूप काळ जपले जातील. जोपर्यंत आमच्या कथा पुन्हा एकमेकांना सापडत नाहीत तोपर्यंत...'क्योंकी सास भी कभी बहू थी' हम है रहती प्यार के फिर मिलेंगे चलते चलते..."

एकता कपूर पोस्ट

"आज 'क्योंकी सास भी कभी बहू थी'चा शेवटचा भाग! काही निरोप कठीण असतात पण माझ्या हृदयात 'क्योंकी सास भी कभी बहू थी'साठी प्रेम आहे. यामुळेच मी आज जी काही आहे, ती बनले आहे. ज्या मालिकेचे १६७ भाग करण्याचे ठरले होते, पण शेवटी ४५० भाग पूर्ण झाले, त्या मालिकेला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. माझं 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेवर नेहमीच प्रेम राहील. पुन्हा भेटेपर्यंत! "

Serial Actress Emotional Post
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची अचानक तब्येत बिघडली; काही दिवसांसाठी घेतलाय ब्रेक, पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता

'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिका 29 जुलै 2025 पासून सुरू झाली होती आणि आता 20 ऑक्टोबरला 2026 मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेचा टीआरपी देखील कायम टॉपवर राहीला होता. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने 2008ला प्रेक्षकांचा निरोप घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com