Ranveer Singh and Deepika Padukone Love Story: बॉलिवूडचे लाडके कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची प्रेमकथा अक्षरशः परीकथेप्रमाणे आहे. ही कथा सिनेमाच्या ऑफ-स्क्रीन जगात सुरू झाली आणि पुढे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुलत गेली. २०१२ साली एका आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदा एकमेकांना पाहिल्यानंतर रणवीर दीपिकाच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने इतका इंप्रेस झाला की त्याच क्षणी त्याचं मन तिच्याकडे ओढलं गेलं आणि सुरु झाली बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा.
त्या पहिल्या भेटीनंतर दोघांमधील नातं केवळ आकर्षणापुरतं मर्यादित राहिलं नाही. २०१३ मध्ये संजय लीला भंसाली यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करताना त्यांच्या नात्याला खरी ओळख मिळाली. सततच्या सहवासातून मैत्री, विश्वास आणि आपुलकी वाढत गेली. याच काळात त्यांच्या नात्यात खोल भावना निर्माण झाल्या आणि तो बंध अधिक घट्ट झाला. चित्रपटातील त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं, तर ऑफ-स्क्रीन नात्याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली.
७ वर्ष चाललेल्या प्रेमप्रवासानंतर रणवीर आणि दीपिकाने २०१८ मध्ये अत्यंत खासगी आणि पारंपरिक पद्धतीने विवाह केला. इटलीमधील लेक कोमो येथे पार पडलेला हा विवाहसोहळा साधेपणा, सोज्वळपणा आणि प्रेमाचा प्रतीक ठरला. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही परंपरांनुसार त्यांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी जीवनसाथी म्हणून स्वीकारलं.
या जोडीने आपलं प्रेम केवळ वैयक्तिक आयुष्यापुरतं न ठेवता चाहत्यांसोबतही ते शेअर केलं. त्यांच्या नात्यातील प्रत्येक टप्पा, प्रत्येक क्षण चाहत्यांना आपलासा वाटला. २०२४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला तीचं नाव या कपलंने दुआ असं ठेवलं आणि त्यांच्या आयुष्यातील हे नवं पर्व त्यांनी अत्यंत आनंदाने साजरं केलं आणि करतं आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.