Amruta Deshmukh Video: मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर मधील शौचालयांची आणि इतर सुविधांची दयनीय अवस्था दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रयोगासाठी कलाकार थिएटरमध्ये गेल्यावर त्यांचे किती हाल आणि गैरसोय होते याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
अमृताने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले की, ‘नियम व अटी लागू’ या त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी येथे आले असता त्यांनी रंगमंदिरातील अस्वच्छ शौचालये, घाणेरडा वास आणि दुरावस्थेची स्थिती पाहिली. तिने याची तुलना पुण्यातील इतर नाट्यगृहांसोबत केली. जिथे शौचालये आणि सुविधांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमध्ये शौचालये अस्वच्छ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अमृताने म्हटले की रंगमंदिराच्या बॅकस्टेजमध्ये आणि शौचालयांमध्ये इतकी घाण आहे की तिथे जास्त वेळ कोणीही थांबू शकत नाही . VIP रूम्ससाठी केलेल्या नूतनीकरणावर पैसा खर्च करण्याऐवजी इतर खोल्या आणि मूलभूत सुविधांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे तिने सांगितले.
अमृताने सफाई करमचाऱ्याला शोच्या फक्त काही मिनिटे आधी येऊन काम करताना म्हटले की अशी व्यवस्था हास्यास्पद आहे आणि कलाकारांना तसेच प्रेक्षकांना या प्रकारच्या परिस्थितीचा सामना का करावा लागतो? त्याचबरोबर तिने पुण्याला “सांस्कृतिक शहर” म्हणून घेतले जाते तरीही अशा परिस्थिती का असते? असा प्रश्नही PMC प्रशासनाला विचारला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला असून अनेकांनी अमृताच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला आहे. प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि प्रशासनाकडून त्वरीत सफाई आणि सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.