Shreya Maskar
'दृश्यम' चित्रपटातील कथानकाला कलाटणी देणारी घटना विजय साळगावकरच्या घरात घडते. येथे विजय साळगावकर आपली बायको आणि दोन मुलांसोबत राहतो. त्याला दोन मुली असतात.
चित्रपट पाहताना विजय साळगावकरचे बंगला हे घर नसून एखादा शूटिंग सेट असल्यासारखे वाटू शकते, पण तसे नाही. 'दृश्यम'मध्ये दाखवलेले घर प्रत्यक्षात उत्तर गोव्यात आहे, जिथे संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटात दाखवलेले विजय साळगावकरचे घर किंवा बंगला खऱ्या आयुष्यात उत्तर गोव्यातील उकासैम (Ucassaim) गावात आहे. हा १०० वर्षे जुना पोर्तुगीज शैलीतील बंगला आहे.
सोशल मीडियावर या सुंदर घराचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. हे घर 'दृश्यम'च्या तिन्ही हिंदी भागांमध्ये दिसले आहे आणि संपूर्ण कथा येथूनच सुरू होते.
चित्रपटामुळे हे ठिकाण एक पर्यटन स्थळ बनले आहे आणि लोक येथे भेट देत असून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. इंटरनेटवर या घराची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.
पहिल्या चित्रपटात हे घर पिवळ्या रंगात रंगवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात ते पांढऱ्या आणि निळ्या रंगात रंगवले होते. लोक या बंगल्याला 'दृश्यम हाऊस' म्हणून ओळखू लागले आहेत.
चित्रपटात दाखवलेले घराचे सौंदर्य त्याच्या साधेपणात आणि पोर्तुगीज-शैलीतील वास्तुकलेत आहे. निळ्या आणि पांढऱ्या भिंती, लाल छत, कमानीदार खिडक्या आणि सभोवतालची हिरवळ यांमुळे ते जुन्या गोव्यातील एका पारंपरिक घरासारखे दिसते.
गोव्याला गेल्यावर आग्वाद किल्ला, बागा बीच, कळंगुट बीच, चापोरा किल्ला, अंजुना बीच, आरंबोल बीच आणि मायेम तलाव या ठिकाणाला भेट द्या.