Kisan Mahapanchayat Yandex
देश विदेश

Farmer Protest: दिल्लीमध्ये आज हजारो शेतकरी एकत्र येणार; किसान महापंचायतीमुळे वाहतुकीत मोठा बदल

Kisan Mahapanchayat: शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रवाशांना नोएडा-दिल्ली मार्गावरील वाहतूक कमी करण्याबाबत सुचना दिली आहे. शेतकऱ्यांच्या किसान महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे.

Rohini Gudaghe

Delhi Farmer Protest At Ramlila Maidan

शेतकरी आज म्हणजेच १४ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘किसान मजदूर महापंचायत’ आयोजित करणार आहे. अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या किसान महापंचायतीला (Kisan Mahapanchayat) परवानगी दिली आहे. परंतु या मेळाव्यात 5,000 पेक्षा जास्त लोक सहभागी होणार नाहीत, अशी अट पोलिसांनी ठेवली आहे. तसेच या मेळाव्याच्या ठिकाणाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलींना परवानगी दिली जाणार नाही.  (Latest Marathi News)

पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांच्या मेळाव्यामुळे दिल्लीतील विविध भागांत वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. गौतम बुद्ध नगर पोलिसांनी बुधवारी प्रवाशांना दिल्लीतील प्रस्तावित शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या (Farmer Protest) पार्श्वभूमीवर नोएडा-दिल्ली मार्गावरील वाहतूक मंद होण्याची शक्यता वर्तवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

दिल्लीतील शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. जारी करण्यात आलेल्या निवेदनात जवाहरलाल नेहरू मार्ग, बाराखंबा रोड, बहादूरशाह जफर मार्ग, टॉलस्टॉय मार्ग, असफ अली (Delhi Farmer Protest) रोड, जयसिंग रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, संसद मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, बाबा खरगसिंग मार्ग, मिंटो रोड, अशोक रोड, महाराजा रणजित सिंग फ्लायओव्हर, कॅनॉट सर्कस, भवभूती मार्ग, डीडीयू मार्ग आणि चमन लाल मार्ग प्रभावित होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी ६ वाजल्यापासून दिल्ली गेट, मीर दर्द चौक, अजमेरी गेट चौक, गुरु नानक चौक, कमला मार्केट, पहाडगंज चौक, झंडेवालान चौक, महाराजा रणजितसिंग फ्लायओव्हर ते बाराखंबा रोड, गुरु नानक चौक, बाराखंबा रोड या मार्गावरून वाहतुक वळविण्यात आली आहे. जनपथ केजी मार्ग क्रॉसिंग आणि जीपीओ (ग्राउंड पोस्ट ऑफिस) राउंडअबाउटपर्यंत वाहतूक वळविली जाऊ (Farmer Protest Traffic Alert) शकते. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी आयएसबीटी, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

शेतकरी किसान महापंचायत

शेतकऱ्यांनी १० मार्च रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन केलं होतं. त्यांनी १० मार्चला दुपारी १२ ते ४ वेळेत आंदोलन केलं होतं. शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. १३ फेब्रुवारीपर्यंत त्यांचा दिल्ली चलो मार्च थांबवण्यात आला (Farmer Protest At Ramlila Maidan) होता. तेव्हापासून शेतकरी खनौरी आणि शंभू सीमेवर तळ ठोकून आहेत. १४ मार्च रोजी दिल्लीमध्ये शेतकरी किसान महापंचायत घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

कार्तिक कृष्ण दशमी: आज सिंह राशीवर चंद्राची कृपा; पाहा कोणत्या राशींना मिळणार मोठा लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT