Farmers Protest : शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव; माकप नेते जे. पी. गावीत यांचा सरकारवर आरोप

Nashik Farmers Protest : आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी राज्यसरकारने यंत्रणांवर दबाव आणला आहे. असे गंभीर आरोप माकप नेते माजी आमदार जे. पी. गावीत यांनी सरकारवर केले आहेत.
Farmers Protest
Farmers ProtestSaam Digital
Published On

Farmers Protest

आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी राज्यसरकारने यंत्रणांवर दबाव आणला आहे. आदिवासी शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्यांची महसूल आणि पोलीस यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. चौकशी करण्यासाठी सुरगाण्यात तलाठी आणि पोलीस कामाला लावले आहेत, असे गंभीर आरोप माकप नेते माजी आमदार जे. पी. गावीत यांनी सरकारवर केले आहेत. दरम्यान जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झालं आहे.

आमचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आमच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आमच्या चौकशा लावणाऱ्या सरकारमधील शक्तींनी पाठीमागून खंजीर खुपसू नये. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी. मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकारला जड जाईल, सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा गावीत यांनी दिला आहे.

Farmers Protest
Kalyan News : पार्किंगच्या वादातून स्वतःची दुचाकी पेटवून होमगार्डची रेल्वेसमोर उडी; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला बैलगाडी मोर्चा

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या माजलगावमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर यावेळी कापसाला 12 हजार रुपये भाव द्या, सोयाबीनला 8 हजार रुपये भाव द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, पिक विमा तात्काळ खात्यावर वर्ग करा तसेच चारा व पाण्याची सोय करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान हा मोर्चा भाई मोहन गुंड व भाई नारायण गोले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

Farmers Protest
Jalna News : ठेवीदारांचा रास्ता रोको; ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com