कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

Kidney Sale Racket: शेतकरी कीडनी विक्री प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले आहेत. बळीराजावर अस्मानी संकट असतानाच कर्जबाजारीपणामुळे 19 शेतक-यांनी किडनी विकल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आलाय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही यावर कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे.
Maharashtra lawmakers raise concerns over alleged kidney sale by debt-ridden farmers during Assembly session
Maharashtra lawmakers raise concerns over alleged kidney sale by debt-ridden farmers during Assembly sessionSaam Tv
Published On

कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरमधील शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणानं राज्य हादरलं होतं. मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. अधिवेशनातही या प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटले. राज्यातील 19 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे किडनी विकली असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत केलाय. महाराष्ट्रात सावकारांचे राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे. हे रॅकेट मोडून काढले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी, या प्रकरणी कारवाईसाठी एसआयटी गठित केली असल्याचे सांगितले.

सत्ताधारी आमदारांनीही या प्रकरणी सरकारला सवाल केला. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण आहे. यातील आरोपी सुटू नयेत म्हणून त्यांना मकोका लावणार का? असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीतून केला.

चंद्रपूरमधील नागभीड येथील शेतकरी रोशन कुळे याला एक लाखासाठी ७४ लाख रुपये सावकाराला द्यावे लागले. किडनी विकून पैसे दिले. त्याशिवाय त्याची शेती गेली. ट्रॅक्टरही उचलून नेलं. या प्रकरणाच्या तपासात किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय. रोशन कुळेंची कंबोडीयात किडनी काढण्यात आली होती. महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा आहे. मात्र त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. खेडोपाड्यातील सावकारीच्या कचाट्यात गरजू बळीराजा अडकतोय. त्यामुळे आता कर्जाचा डोंगर अस्मानी आणि सुल्तानी संकटानं पिचलेल्या बळीराजाच्या किडनीवर उठलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com