केरळमध्ये एका महिलेने बसमध्येच बाळाला जन्म दिला आहे. केरळमधील त्रिशूरमध्ये केएसआरटीसीच्या बसमध्ये एका महिलेची प्रसूती झाली आहे. महिलेला बसमध्येच प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या.त्यावेळी ड्रायव्हरने प्रसंगावधान बस हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. रुग्णालयात पोहचल्यावर महिलेला इमरजन्सी वॉर्डमध्ये नेऊन प्रसुती करणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टरांना बसमध्येच महिलेची प्रसूती बसमध्येच करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे वय ३७ आहे.ती मल्लपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. महिला आपल्या नवऱ्यासोबत त्रिशूरहून कोझिकोडमधील थोतिलपालमला जात होती. बसमध्येच महिलेला वेदना सुरु झाल्या. ही परिस्थिती लक्षात येताच बस ड्रायव्हरने लगेचच बस हॉस्पिलटकडे नेली. बस हॉस्पिटलजवळ पोहचेपर्यंत महिलेला वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी बसमध्येच महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओत बस एका हॉस्पिटलसमोर थांबलेली दिसत आहे. बसमधील महिलेला खूप वेदना होत होत्या. या परिस्थितीचे भन लक्षात घेऊन नर्स आणि डॉक्टर इतर प्रवाशांना बसमधून बाहेर काढताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक महिलेच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत आहे. परंतु तिला हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य नसल्याने महिलेने बसमध्येच बाळाला जन्म दिला.
याबाबत हॉस्पिटलचे डॉक्टर यासिर सुलेमान यांनी सांगितले की, महिलेला प्रसूती वेदना आधीच सुरु झाल्या होत्या. तिला इमरजन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करणे अशक्य होते. त्यामुळेच महिलेची बसमध्ये प्रसूती केली. बाळ आणि आईला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.