Hush Money Case: डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका; 'हश मनी' प्रकरणात दोषी, लवकरच शिक्षा सुनावणार

Donald Trump Guilty : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. हश मनी प्रकरणातील ३४ प्रकरणांमध्ये न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे.
Hush Money Case
Donald Trump Case Verdict Saam Tv

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांना 'हश मनी' प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायाधीशांनी सुमारे १० तास महत्त्वपूर्ण निकालाबाबत चर्चा केली. पंरतु या हश मनी प्रकरणात डोनाल्ड ट्र्म्प यांना काय शिक्षा होणार याची सुनावणी येत्या ११ जुलै रोजी होणार आहे. डोनाल्ड ट्र्म्प हे गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासात असे घडले नव्हते.

Hush Money Case
International Brothers Day: यंदाच्या बदर्स डेनिमित्त भावाला द्या हे गिफ्ट; भाऊ होईल खूश

नक्की प्रकरण काय ?

डोनाल्ड ट्र्म्प यांना पॉर्न स्टार्ससोबत केलेल्या व्यवहाराच्या तब्बल ३४ प्रकरणात अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी अडल्ट फिल्म स्टार (Star) हिच्यासोबत असलेल्या पूर्वीच्या संबंधांबाबत भाष्य करू नये म्हणून तिला त्यांनी पैसे दिले होते.

साधारण २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यानचे हे सर्व प्रकरण आहे. या प्रकरणावर गुरुवारी ९ तास अंतिम सुनावणी पार पडली. तब्बल १२ सदस्यीय न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवले. मात्र आता त्यांना या प्रकरणी कोणती शिक्षा सुनावली जाते हे ११ जुलै रोजी स्पष्ट होईल.

अडल्ट फिल्म स्टार हिने डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत आपले पूर्वी संबंध असल्याचा दावा केला होता. तिने त्या संबंधीच्या अनेक गोष्टी अमेरिकेतील काही प्रकाशंकाकडे सर्वांपर्यंत समजण्यासाठी पाठवल्या होत्या. मात्र या गोष्टी अमेरिकेत चर्चेला कारण ठरू नये, असे ट्र्म्प यांना वाटत होते. म्हणून ट्र्म्प यांनी तिला १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचा आरोप होता. त्यानंतर काही वर्षांनी २०१८ मध्ये एका जर्नलने ट्र्म्प आणि तिच्यामध्ये झालेला व्यवहार उघड केला होता. २०१८ च्या प्रकरणानंतर ट्र्म्प यांच्यावर फौजदारी खटला चालवण्यात आला. यात कोर्टाने ६ आठवड्यांच्या कालावधीत २२ साक्षीदारांची साक्ष घेतली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवले.

डोनाल्ड ट्र्म्प यांना दोषी ठरवण्यात आले, तेव्हा ते कोर्टात उपस्थित होते. दरम्यान माध्यमांशी बोलताना ट्र्म्प यांनी न्यायाधीशांवर टीका केली असून, त्यांना भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले. तसेच ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान अमेरिकेतील जनता खरा निर्णय देईल असेही डोनाल्ड ट्र्म्प यांनी म्हटले.

Hush Money Case
International Tea Day: जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com