International Tea Day: जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

International Tea Day History:चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असं अनेक लोक म्हणतात. विशेष म्हणजे, चहाप्रेमींसाठी चहा पिणे हे कोणत्या सुखाशिवाय कमी नसते. जगात असंख्य लोक चहा पितात.
International Tea Day:
International Tea Day:Saam Tv

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असं अनेक लोक म्हणतात. विशेष म्हणजे, चहाप्रेमींसाठी चहा पिणे हे कोणत्या सुखाशिवाय कमी नसते. जगात असंख्य लोक चहा पितात. भारतात तर असंख्य लोकांच्या घरात सकाळची सुरुवात चहाने होते. याच चहासाठी २१ मे रोजी जागतिक चहा दिन म्हणून साजरा केला जातो.

२००५ साली सर्वात पहिला जागतिक चहा दिन साजरा करण्यात आला. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी चहा दिन साजरा केला जायचा. २०१५ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. २१ डिसेंबर २०१९ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करतात. २१ मे २०२० रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

जगात चहाचा वापर वाढवणे आणि लोकांना चहा पिण्याचे फायदे पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. चहाची पाने गोळा करणे, वाळवणे, त्यानंतर पॅकिंग करणे या सर्व गोष्टींची माहित सर्वांना होणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

चहाचे फायदे

चहा प्यायल्याने शरीरासोबत मनालादेखील अनेक फायदे होतात. आपला मूड फ्रेश होते. घरी, ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी फ्रेश होण्यासाठी चहा पितात. चहा प्यायल्याने सर्दी खोकला आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

International Tea Day:
Relationship Tips: बॉयफ्रेंडचं असं वागणं म्हणजे ब्रेकअपचे संकेत; तुटण्याआधी वाचवा नातं

भारतातील काही प्रसिद्ध चहा

आसामचा रोंगा साह

आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये उगणाऱ्या पानांपासून हा खास चहा बनवला जातो. हा चहा थोडासा लालसर रंगाचा असतो.

दार्जिंलिंग चहा

देशातील सर्वात जास्त चहा हा दार्जिंलिंग येथे उगवतो. तेथे चहाचे खूप मोठे मोठे मळे आहेत.

तमिळनाडूचा निलगिरी चहा

निलगिरीच्या डोगरांमध्ये हा चहा उगवला जातो. या चहाला एक वेगळाच स्वाद असतो.

International Tea Day:
Hair Care Tips: केसांना कंडिशनर लावताना 'या' चूका करू नका; अन्यथा पडेल टक्कल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com