Transgender Ward : राज्यात पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये तृतीयपंथींसाठी विशेष वॉर्ड

Maharashtra News : महाराष्ट्र सरकारनं तृतीयपंथींसाठी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच विशेष वॉर्ड सुरू केले आहे.
GT Hospital, CSMT Mumbai
GT Hospital, CSMT MumbaiSAAM TV
Published On

Maharashtra News : महाराष्ट्र सरकारनं तृतीयपंथींसाठी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच विशेष वॉर्ड सुरू केले आहे. मुंबईतील जीटी हॉस्पिटलमध्ये हे विशेष वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. ३० खाटांचं हे विशेष कक्ष असून, वैद्यकीय उपचारांसह तिथे मानसिक आरोग्य समुपदेशनही केले जाणार आहे.

समाजात स्त्री-पुरुषांना मिळणारे अधिकार आणि मान तृतीयपंथींनाही मिळायला हवा. त्यांचे जगणे सुकर व्हायला हवे, वेळप्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयातही त्यांना स्वतंत्र अस्तित्व असावे.

त्यांची देखभाल केली जावी यासाठी तृतीयपंथींसाठी विशेष कक्ष (Hospital Ward) असावा या राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेला यश येत असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. मुंबईतील जी. टी. रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहे.

तृतीयपंथींना रुग्णालयात (Hospital) उपचार घेण्याच्या वेळी स्त्री अथवा पुरुष कक्षात दाखल केले जाते. काही वेळा कुठल्या कक्षात दाखल केले जावे यावरून गोंधळही होतो. या सगळ्यामुळे तृतीयपंथींची (Transgender) कुंचबना, गैरसोय होत असते. हे थांबवण्यासाठी त्यांना सन्मानाने वैद्यकीय उपचार (Medical Treatment) मिळणे आवश्यक आहे.

GT Hospital, CSMT Mumbai
Nandurbar News: ग्रामपंचायतीसमोरच हातभट्टयांची केली होळी; महिला बचत गट आक्रमक

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीवेळी तृतीयपंथींसाठी स्वतंत्र वॅार्ड किंवा २५ विशेष बेड असावे, अशी सूचना केली होती. वेळोवेळी रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला.

GT Hospital, CSMT Mumbai
Amravati Graduate Constituency : मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

त्याअनुषंगाने रुग्णालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन त्यांचा अहवाल आल्यानंतर तृतीयपंथीयांकरिता स्वतंत्र १५ खाटांचा कक्ष तयार करण्याचे काम सुरू केले. या कक्षाचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच कार्यान्वित होणार आहे.

ससून, जी.टी या रुग्णालयांप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करत त्यांचे जगणे सुकर करावे, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com