Congress-led UDF celebrates massive victory in Kerala as Left Front faces a major electoral setback. saam tv
देश विदेश

डाव्यांचा शेवटचा गड ढासळला; केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?

Kerala Assembly Election Results 2026 UDF Vs LDF Full Results: केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीचा मोठा विजय झाला असून एलडीएफचा पराभव झाला आहे. भाजपला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

Omkar Sonawane

देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून केरळ आणि तामिळनाडू सोडून भाजपचा मोठा विजय झाला आहे. कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीने केरळमध्ये 94 जागांवर आघाडी घेतली असून बहुमताच्या आकड्याच्या पुढे ही संख्या पोहोचली आहे. तर सत्ताधारी माकप 41 जागांवर आघाडी आहे. तर भाजपला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आहे.

मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झीट पोलमध्ये कॉँग्रेसप्राणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा पराभव होईल, असाही अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला होता.

डाव्यांचा शेवटचा गड ढासळला

यापूर्वी डाव्या पक्षांनी बंगालमध्ये 1977 ते 2011 मध्ये एकहाती सत्ता मिळवली. त्रिपुरा राज्यात 1993 ते 2018 पर्यंत सत्ता काबिज केली. तर केरळमध्ये युडीएफ आणि एलडीएफ यांची आलटून पालटून सत्ता येत होती. 2021 च्या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत लाल झेंडा फडकवला. आता या निकालाने माकपला सुरुंग लागला असून देशभरात एकाही राज्यात त्यांचे सरकार नसणार आहे.

UDF मधील पक्ष कोणते?

कॉँग्रेस

इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML)

केरळ कॉँग्रेस

रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP)

केरळ कॉँग्रेस (जॅकब)

रिव्होल्युशनरी मार्क्सीस्ट पार्टी ऑफ इंडिया (RMPI)

LDF मध्ये कोणते पक्ष आहेत?

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) CP(M)

भारतीय कम्युनिस्ट पक्ष(CPI)

राष्ट्रीय जनता दल (RJD)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचेही निधन

साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप, उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थन

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

SCROLL FOR NEXT