GT vs PBKS: पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव, रोमांचकारी सामन्यात गुजरातनं बाजी मारली

GT vs PBKS: आयपीएल २०२६ च्या दुहेरी सामन्यातील दुसरा सामना ३ मे रोजी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने पंजाबला पराभूत करून दोन गुण मिळवले आहेत.
GT vs PBKS: पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव, रोमांचकारी सामन्यात गुजरातनं बाजी मारली
Published On

आयपीएल २०२६ मध्ये सलग तिसरा विजय मिळवून गुजरात टायटन्सने प्लेऑफची स्पर्धात अधिक चुरशीची बनवली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने एका थरारक आणि कमी धावसंख्येच्या सामन्यात पंजाब किंग्सला ४ गडी राखत पराभूत केलं. शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला होता. मैदानावरील खेळाडूंप्रमाणेच टीव्ही समोर बसलेल्या चाहत्यांचा जीव ही तळ्यात मळ्यात होत होता.

GT vs PBKS: पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव, रोमांचकारी सामन्यात गुजरातनं बाजी मारली
IPL: हार्दिकच्या चुकांमुळे मुंबई इंडियन्सच्या नशिबी पराभव; माजी क्रिकेटरची नेतृत्त्वावर टीका

गुजरात बाजी मारणार की पंजाब जिंकणार या विचाराने अनेकांची धडधड वाढली होती. परंतु अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने षटकार ठोकून संघाच्या विजय निश्चित केला. गुजरातच्या विजयाचा स्टार जेसन होल्डर ठरला. त्याने चार बळी घेत पंजाबचा धुव्वा उडवला. स्पर्धेत अव्वल क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्सचा हा सलग दुसरा पराभव होता.

GT vs PBKS: पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव, रोमांचकारी सामन्यात गुजरातनं बाजी मारली
टी२० क्रिकेट संघात निवड न झाल्यानं नैराश्याने गाठलं; क्रिकेटरनं आयुष्य संपवलं

आयपीएल २०२६ च्या ४६ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स आमने-सामने आले होते. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ९ विकेट गमावत १६३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने ४ विकेट राखत विजय मिळवला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानेही आपली पहिली विकेट दुसऱ्या षटकात गमावली. पहिला धक्का कर्णधार शुभमन गिलच्या रुपाने बसला. त्याने फक्त ५ धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत नेलं.

मात्र कालांतराने संघाने विकेट्स गमावल्या. एकामागून एक विकेट पडत होत्या, पण सुदर्शनने संयम राखत धावसंख्या पुढे नेत ठेवली. सुदर्शनने या हंगामात चौथ्यांदा अर्धशतक करत संघाला १२० धावांच्या पुढे नेले. त्याचदरम्यान पंजाबच्या गोलंदाजांनी सुदर्शनला बाद केलं. सुदर्शन ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने संयमी खेळ खेळला. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना गुजरातला विजय मिळवता आला. अर्शद खानने चौकार मारला, तर सुंदरने नाबाद ४० धावा केल्या. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून विजय निश्चित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com