पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान; PM मोदींनी मांडलं सत्तेचं गणित, निवडणूक आयोगाचंही केलं कौतुक

West Bengal election voting percentage narendra modi reaction : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया देताना मोठे संकेत दिले. भाजपला राज्यात मोठा विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के मतदान, पंतप्रधान मोदींनी दिले मोठे संकेत
PM Modi in West Bengalsaam tv
Published On

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 'बंपर' मतदान झाले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी बघता राज्यात भाजपला मोठा विजय मिळेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर आणि मथुरापूरमध्ये निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झालं. त्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

पश्चिम बंगालच्या जनतेने भरभरून मतदान केलं. हे मतदान परिवर्तनासाठी जनादेश दिल्याचे संकेत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान घेण्यात आले. १५२ जागांसाठी येथील जनतेने भरभरून मतदान केले असून, ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचंही कौतुक केले. निवडणूक मतदानावेळी मोठ्या हिंसक घटना घडू दिल्या नाहीत, यासाठी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो. पश्चिम बंगालच्या मागील ५० वर्षांच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच हिंसक घटना कमी झाल्या. मतदानाबाबत माझ्यापर्यंत आलेल्या आकडेवारीवरून मला पूर्ण विश्वास वाटतो की बंगालच्या मतदारांनी परिवर्तनाच्या बाजूने दिलेला मोठा जनादेश असेल, असेही मोदी म्हणाले. देशातील अन्य राज्यांमधील मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देतानाच, जेव्हा जेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले, तेव्हा भाजपला निर्णायक विजय मिळाला आहे, असंही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के मतदान, पंतप्रधान मोदींनी दिले मोठे संकेत
West Bengal Politics: ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

झालमुडीनंही जोरदार झटका दिला

पहिल्या टप्प्यात बंगालच्या १५२ विधानसभा जागांसाठी मतदान झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. काही ठिकाणी किरकोळ हिंसक घटना घडल्या. मजमोजणीनंतर भाजप विजयोत्सव साजरा करेल. लोकांना मिठाईसोबत झालमुडीही दिली जाईल. झालमुडीने काही लोकांना जोरदार झटका दिला आहे, असं मी ऐकलं आहे. मी झालमुडी खाल्ली, पण काही लोकांना मिरची लागली, असा टोलाही मोदींनी लगावला.

पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के मतदान, पंतप्रधान मोदींनी दिले मोठे संकेत
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com