Police personnel investigate the spot where Karni Sena youth leader Himanshu Singh was stabbed to death in Jamshedpur. saam tv
देश विदेश

पोलिसांसमोरच राजकीय नेत्याची चाकूने भोसकून हत्या; राजकारणात मोठी खळबळ

Karni Sena Leader Killed In Front Of Police In Jamshedpur: जमशेदपूरमध्ये पोलिसांच्या समोरच करणी सेनेच्या युवा नेत्याची चाकूने हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजपने झारखंड सरकारवर जोरदार टीका करत कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Omkar Sonawane

झारखंडमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 30 जून रोजी जमशेदपूरच्या बिष्टुपूर येथील डबल डाउन बारच्या बाहेर पोलिसांच्या समोरच करणीसेनेचे जिल्हा युवा अध्यक्ष हिमांशू सिंह यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात अपराध्यांचे सरकार चालत असल्याचा आरोप केला.

आदित्य साहू म्हणाले, पोलिसांच्या उपस्थितीतच एका तरुणाची हत्या झाली. ही घटना झारखंडमध्ये गुन्हेगारांचे राज्य असल्याचे स्पष्ट दाखवते. गुन्हेगार पोलिसांसमोरच मोकाट फिरत आहेत. ज्या पोलिसांसमोर ही हत्या झाली, त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कारवाई करावी. पोलिस अधिकाऱ्यांचे काम रात्रीच्या अंधारात वाळूच्या गाड्या मोजणे एवढेच आहे. असा मोठा आरोप त्यांनी केला, या घटनेच्या निषेधार्थ भाजपने 3 जुलै रोजी जमशेदपूर बंदचे आवाहन केले असून जोरदार आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते बाबूलाल मारांडी यांनी एक्सवर संताप व्यक्त करत लिहीले की, जमशेदपूरमध्ये पोलिसांच्या समोरच करणी सेनेचे नेते हिमांशू सिंह यनाची चाकूने हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दु: खद आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह भे राहिले आहे. गेल्या वर्षी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विनय सिंह यांचीही गोली झाडून हत्या करण्यात आली होती, अशा सलग घटनांमुळे राज्यात गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे दिसते आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मरांडी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांची भूमिका आणि हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT