Bengaluru Innerwear Theft Youth Arrested Saam Tv
देश विदेश

Shocking: रात्री महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा, घरी नेऊन घालायचा अन्...; तरुण विकृत कृत्य का करायचा?

Bengaluru Innerwear Theft Youth Arrested: रात्री फिरून घराबाहेर वाळत घातलेले महिलांचे अंतर्वस्त्र चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. हा तरुण हे अंतर्वस्त्र चोरून ते घरी न्यायचा आणि घालून फोटो काढायचा.

Priya More

Summary -

  • बंगळुरूमध्ये विचित्र आणि धक्कादायक घटना उघड

  • २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली

  • महिलांचे अंतर्वस्त्र चोरी करायचा तरुण

  • महिलांचे अंतर्वस्त्र घालून फोटो काढायचा

कर्नाटक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. हा तरुणी महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि ते घरी नेऊन घालायचा. या तरुणाचे कृत्य ऐकून पोलिसही चक्रावले. ही विचित्र घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या हेब्बागोडी भागात घडली. महिलांचे अंतर्वस्त्र चोरल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुण अमल एन. अजीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा तरुण केरळचा रहिवासी असून हेब्बागोडी परिसरात राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यानगर परिसरातील घरांना लक्ष्य करायचा. या ठिकाणी राहणाऱ्या महिलांचे घराबाहेर किंवा घराच्या टेरेसवर सुकण्यासाठी टाकलेले अंतर्वस्त्र तो चोरायचा. सुरूवातीला महिलांनी अंतर्वस्त्र चोरीला जायचे याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर चोरीचे प्रमाण वाढले. आरोपी या महिलांचे अंतर्वस्त्र चोरून घरी न्यायचा आणि ते स्वत: घालून फोटो काढायचा.

बुधवारी होयसळा परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी या तरुणाजवळ असलेला मोबाईल जप्त करून तो तपासला असता त्यांना धक्का बसला. या तरुणाच्या मोबाईलमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र घातलेले त्याचे फोटो आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या घराची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना अनेक महिलांचे चोरीला गेलेले अंतर्वस्त्र सापडले.

या प्रकरणी हेब्बागोडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या संबंधित कलमांतर्गत तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी तरुण गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा. त्याच्यावर इतर पोलिस ठाण्यात देखील या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. हा तरुण असे कृत्य का करत होता याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेची चर्चा संपूर्ण कर्नाटकात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT