Crime Saam tv
देश विदेश

Crime News : गर्लफ्रेंडच्या कुटुंबाचा विरोध, बॉयफ्रेंडनं उचललं टोकाचं पाऊल; मुलीच्या घरासमोरच घडलं अनर्थ

Karnataka Crime: कर्नाटकमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधात यश न मिळाल्याने आत्महत्या केली. त्याने प्रेयसीच्या घरासमोर जिलेटिन स्टीक वापरुन स्फोट करत स्वत:चा जीव संपवला.

Saam Tv

Karnataka Crime: कर्नाटकमध्ये एक थरारक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या घरासमोर आत्महत्या केली आहे. त्याने जिलेटिन स्टीकचा वापर करुन स्फोट करत स्वत:चा जीव संपवला. प्रेमसंबंधात यश नकार मिळाल्याने तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ही घटना कर्नाटकच्या मंड्या जिह्यातील कालेनहल्ली गावात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रामचंद्र असे आहे. रामचंद्र काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात होता. ते दोघे एकत्रही होते. अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाविषयी समजले. पुढे रामचंद्रवर पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. रामचंद्र तीन महिन्यांसाठी तुरुंगात होता."

"तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर रामचंद्रने त्या मुलीच्या घरच्यांची भेट घेतली आणि प्रकरण मिटवण्यासाठी तडजोड केली. त्यानंतर त्याच्याविरोधचा खटला मागे घेण्यात आला. एवढं सगळं घडूनही तुरुंगातून बाहेर आल्यावर रामचंद्र त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला भेटू लागला. त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा सुरु झाले," अशी माहिती स्थानिक पोलिसांनी माध्यमांना दिली.

दरम्यान अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावण्याचे ठरवले. अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच एखाद्या चांगल्या तरुणांशी लग्न लावून देण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला. हे रामचंद्रला समजले आणि तो प्रेयसीच्या घराजवळ पोहोचला. प्रेमसंबंधांना परवानगी न दिल्याने आणि त्यात अपयश आल्याने त्याने प्रेयसीच्या घरासमोर जिलेटिन स्टीकचा स्फोट करुन आत्महत्या केली.

"रामचंद्र मंड्या जिल्ह्यातील नागमंगला तालुक्यात राहतो. त्याचे कुटुंबीय उत्खनन व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. तेव्हा कामामध्ये लागणाऱ्या जिलेटिन स्टीकचा वापर करुन रामचंद्रने आत्महत्या केली," असे कर्नाटक पोलिसांनी म्हटले आहे. तर रामचंद्रच्या घरच्यांनी त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे असे म्हणत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

SCROLL FOR NEXT