Beed crime : बीडचा बिहार झालाय? वर्षभरात 10 हजारांहून अधिक गुन्हे

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे बीडमधील कायदा सुवस्थेचा प्रश्न पुन्हा एखदा उपस्थित झालाय. मागील दोन वर्षांमध्ये बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद वाढलाय.
Beed district faces rising crime with over 10,100 cases registered in 2024, raising questions about law and order in the region. The recent murder of Sarpanch Santosh Deshmukh highlights growing concerns about criminal activities and underworld presence in Beed, Maharashtra. Learn more about the rising crime rates and government actions.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Beed crime capital of MaharashtraSaam TV News
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Beed Local Crime News in Marathi : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. बीडमध्ये वर्षभरात तब्बल 10 हजार 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाल्याने बीड आहे की बिहार असा प्रश्न विचारला जातोय. बीडमध्ये फोफावतंय अंडरवर्ल्ड? बीड बनलंय क्राईम कॅपिटल? बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद का वाढलाय? असे प्रश्न बीडमध्ये विचारले जात आहेत.

या हवेत फायरिंगच्या घटना उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील नाहीयेत.. तर या घटना आहेत पुरोगामी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील.... बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या पोलीस प्रशासनाची लक्तरं वेशीवर टांगले गेले आहेत.. तर बीड जिल्ह्यात दहशत माजवण्यासाठी, गाडी घेतली म्हणून आनंद साजरा करण्यासाठी हवेत फायरिंग केली जातेय.. तर कुठं कमरेला बंदूक लावून व्हिडीओ बनवण्याचा बीड पॅटर्न समोर आलाय.. एवढंच नाही तर बीडमध्ये वर्षभरात तब्बल 10 हजार 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाल्याने बीड आहे की बिहार असा प्रश्न विचारला जातोय.. नेमकं गुन्हेगारीची राजधानी बनत असलेल्या बीडची स्थिती कशी आहे? पाहूयात...

Beed district faces rising crime with over 10,100 cases registered in 2024, raising questions about law and order in the region. The recent murder of Sarpanch Santosh Deshmukh highlights growing concerns about criminal activities and underworld presence in Beed, Maharashtra. Learn more about the rising crime rates and government actions.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; सीआयडीला सापडला मोठा पुरावा,VIDEO

बीड बनलंय क्राईम कॅपिटल

2023

हत्या- 62

हत्येचा प्रयत्न-154

बीडमधील गुन्हे- 8960

2024 वर्ष

हत्या - 40

हत्येचा प्रयत्न- 178

जमावाद्वारे मारहाण- 498

महिला अत्याचार- 156

विनयभंगाच्या घटना- 386

बीडमधील एकूण गुन्हे- 10 हजार 100

Beed district faces rising crime with over 10,100 cases registered in 2024, raising questions about law and order in the region. The recent murder of Sarpanch Santosh Deshmukh highlights growing concerns about criminal activities and underworld presence in Beed, Maharashtra. Learn more about the rising crime rates and government actions.
Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; वाल्मीक कराडसह ४ आरोपींचे बँक खाते गोठवलं

बोगस मतदान, मारामाऱ्या, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले, जातीय हल्ले बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. एवढंच नाही तर राज्यातील नागपूर, कोल्हापूर आणि साताऱ्यानंतर सर्वाधिक 1222 शस्त्र परवाने हे बीड जिल्ह्यात आहेत. वर्षभरात बीडमध्ये 100 पेक्षा जास्त फायरिंगच्या घटना घडल्या आहेत.. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ज्यांचे शस्त्रासोबत फोटो असतील ते तपासून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मात्र सरकारने एवढ्यावरच न थांबता बीडमधील गुन्हेगारी समूळ नष्ट करून बीडला गुन्हेगारीची राजधानी बनण्यापासून वाचवण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com