justice ayesha malik  saam tv
देश विदेश

Ayesha Malik: पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या आयेशा मलिक

लाहोर उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, 1966 मध्ये जन्मलेल्या मलिक यांचे पॅरिस, न्यूयॉर्क आणि कराची येथे शालेय शिक्षण झाले आहे

साम न्यूज नेटवर्क

पाकिस्तान : न्यायमूर्ती आयशा मलिक (ayesha malik) यांनी सोमवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. पुराणमतवादी मुस्लिम बहुसंख्य देशाच्या न्यायालयीन इतिहासातील हा एक अनाेखा क्षण ठरल्याची चर्चा तेथे आहे. (justice ayesha malik takes oath as first woman judge of pakistans supreme court)

न्यायमूर्ती मलिक यांची मार्च २०१२ मध्ये पाकिस्तानच्या (pakistan) लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्या जून २०३१ मध्ये (सेवानिवृत्त होईपर्यंत) सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या औपचारिक सभागृहात आयोजित एका समारंभात सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी न्यायमूर्ती मलिक यांना शपथ दिली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ऍटर्नी जनरल, वकील, कायद्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सरन्यायाधीश अहमद म्हणाले न्यायमूर्ती मलिक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत आणि पदोन्नतीसाठी इतर कोणीही पात्र नाही.

लाहोर उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, 1966 मध्ये जन्मलेल्या मलिक यांचे पॅरिस, न्यूयॉर्क आणि कराची येथे शालेय शिक्षण झाले आहे. त्यांनी पाकिस्तान कॉलेज ऑफ लॉ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT