Balasaheb Thackeray: जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात राहतील : नरेंद्र माेदी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती आहे. या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंना देशभरातील नेते आदरांजली वाहत आहेत.
shivsena chief balasaheb thackeray
shivsena chief balasaheb thackeraysaam tv

दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेत राहिले. सर्व सामान्य कुटुंबातील नागरिकांच्या हदयात त्यांनी एक विशिष्ट स्थान मिळविले आहे. आज ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त देशातील विविध नेते, नागरिक त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या आठवणींना उजाळा देताहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील ट्विट करुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदींनी (narendra modi) जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शिवसेना (shivsena) प्रमुख बाळसाहेब ठाकरे (balasaheb thackeray) हे कायम स्मरणात राहतील असे ट्विट करुन ठाकरे हे जनतेमधील उत्तम नेते हाेते असे नमूद केले आहे.

कट्टर हिंदुत्ववादी नेते, ठाकरे यांचा जन्म १९२६ मध्ये झाला. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सन २०१९ पर्यंत भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून सेना बराेबर होता. ठाकरे यांचे सन २०१२ मध्ये निधन झाले. दर वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गत २ वर्षांपासून काेविड १९ च्या संकटामुळे बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

shivsena chief balasaheb thackeray
Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधणार
shivsena chief balasaheb thackeray
नाशिकचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com