Congress: प्रदेशाध्यक्षांच्या विराेधात BJP आक्रमक; मंगळवेढा, बीड, नागपूरात आंदाेलन

नाना पटाेलेंच्या विराेधात भाजप आक्रमक झाली आहे.
bjp protest against congress leader nana patole
bjp protest against congress leader nana patolesaam tv

पंढरपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरात नाना पटाेले यांचा भाजप कार्यकर्ते निषेध नाेंदवित आहेत. मंगळवेढयात आज नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळयाचे दहन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (narendra modi) बद्दल टिंगल टवाळी करणारे वक्तव्य केल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. सोलापूर (solapur) लोकसभा भाजप संघटक शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा येथे भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले (nana patole) यांच्या पुतळ्याला जोडे मारले यांनतर पटोले यांचा पुतळ्याचे दहन केलं.

नागपूरात गाढवासह आंदाेलन

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने (nagpur) जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात चार गाढव आणले हाेते. त्याच्या पाठीवर आमच्या गावाचा नाना पटोले असे फलक लावत नाना पटोले आणि काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाना पटोले यांच्या विरोधात भाजप (bjp) आणि युवा मोर्चा चांगलाच आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनात गाढव सहभागी करून नाना पटोले यांना गाढवाची उपमा या कार्यकर्त्यांनी दिली.

bjp protest against congress leader nana patole
ICC Awards 2021: स्मृती मंधानाने पटकाविला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा सन्मान

नाना पटोलें विरोधात बीड भाजप आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांच्याबद्दल दुसऱ्यांदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेसचे (congress) महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला बीडमध्ये (beed) जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचा फोटो असलेल्या बॅनरवर मद्य ओतून निषेध केला. भाजप कार्यालयासमोर राजेंद्र मस्के (भाजपा जिल्हाध्यक्ष) व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असून यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये भाजप पदाधिकार्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

edited by : siddharth latkar

bjp protest against congress leader nana patole
Why I killed Gandhi: हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ नये - कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...
bjp protest against congress leader nana patole
Rafael Nadal: मेलबर्न समर सेट करंडक जिंकला; 'हे कोर्ट नेहमीच माझ्यासाठी खास'
bjp protest against congress leader nana patole
Satara: 'नाना पटाेलेंनी 'तो मी नव्हेच' असा पळपुटेपणा करू नये'
bjp protest against congress leader nana patole
Karnataka: मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केली महत्वाची घाेषणा; Weekend Curfew हटवला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com