Guinness Book: एका मिनीटात सर्वाधिक पुश-अप मारण्याचा नवा विक्रम थौनाओजम निरंजॉय सिंगच्या नावावर

मला त्याच्या यशाचा खूप अभिमान वाटतो असे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे.
Thounaojam Niranjoy Singh
Thounaojam Niranjoy SinghSaam Tv

इम्फाळ : अझ्टेक स्पोर्ट्स मणिपूरने इम्फाळ येथील अझ्टेक फाईट स्टुडिओ येथे आयोजिलेल्या पुश-अप मारण्याचा उपक्रमात मणिपूरच्या थौनाओजम निरंजॉय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) याने एका मिनिटात १०९ पुश-अप (finger-tip push-ups) पूर्ण करून स्वतःचाच १०५ पुश-अप मारण्याचा जुना विक्रम मोडला आहे. आता थौनाओजम निरंजॉय सिंग याच्यावर नव्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची (Guinness Book of World Records) नाेंद झालेली आहे. (manipur youth thounaojam niranjoy singh does 109 fingertip push ups in one minute sets new guinness world record)

Thounaojam Niranjoy Singh
Abhijeet Bichukale: बिग बॉस 15; साता-याच्या अभिजीत बिचुकलेचं आव्हान संपुष्टात?

एएनआयने या रेकॉर्डब्रेक प्रयत्नाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या क्लिपला आता ट्विटर वापरकर्त्यांकडून माेठा प्रतिसाद मिळू लागला आहे. कायदा आणि न्याय मंत्री तसेच देशाचे माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सिंगचे अभिनंदन केले आहे. "एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (बोटांच्या टोकांवर) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सिंगची अविश्वसनीय शक्ती पाहून मला त्याच्या यशाचा खूप अभिमान वाटतो!" असे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले आहे.

अलिकडच्या काळात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केलेला आणखी एक भारतीय म्हणजे प्रतीक विठ्ठल मोहिते. महाराष्ट्रातील (maharashtra) मोहिते यांनी सर्वात कमी स्पर्धात्मक शरीरसौष्ठवपटू (पुरुष) म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकला. तो 102 सेंटीमीटर (3 फूट आणि 4 इंच) उंच आहे.

सन २०२० मध्ये चेन्नईतील (chennai) एका युवकाने (youth) श्वास रोखून धरत सहा रुबिकचे क्यूब्स (काेडे) पाण्याखाली सोडवून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. इल्याराम सेकरने अवघ्या 2 मिनिटे आणि 17 सेकंदात हे टास्क पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या रेकॉर्डची नाेंद झाली. सन २०१३ पासून रुबिकचे क्यूब्स सोडवण्यास सुरुवात करणारे सेकर म्हणाले की, दीर्घकाळ पाण्याखाली राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी तो नियमितपणे योगाभ्यास करतो.

edited by : siddharth latkar

Thounaojam Niranjoy Singh
Poonam Pandey: पाॅर्न फिल्म प्रकरणात पूनम पांडेला सर्वाेच्च न्यायालयात मिळाला दिलासा
Thounaojam Niranjoy Singh
पीव्ही सिंधूने पटकाविले Syed Modi International Badminton चे अजिंक्यपद; मालविका बनसाेड उपविजेती
Thounaojam Niranjoy Singh
'तिला स्ट्रेच मार्क्स नको होते'; सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केल्यामुळे प्रियंका-निक ट्रोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com