'तिला स्ट्रेच मार्क्स नको होते'; सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केल्यामुळे प्रियंका-निक ट्रोल

अभिनेत्रीने ही चांगली बातमी जाहीर केल्याने बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते आनंदित झाले होते, तर काहींनी सरोगसीचा पर्याय निवडल्याबद्दल तिच्यावर टीका देखील केली आहे.
Priyanka And Nick
Priyanka And NickSaam Tv
Published On

मुंबई - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी अलीकडेच पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. त्यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. या बातमीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आणि अनेकांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) केलेल्या या घोषणेनंतर काही वेळातच, प्रियांका आणि निक यांनी ट्रेंडिंग लिस्टमध्ये टॉप स्पॉट्समध्ये स्थान मिळवले आणि या बातमीची जगभरात चर्चे होऊ लागली. प्रियांका आणि निकने आपल्या बाळाचे नाव आणि त्यांना मुलगा झाला आहे की मुलगी हे अद्याप उघड न करण्याची पुरेशी काळजी घेतली असताना, Us Weekly ने पुष्टी केली की या जोडप्याला एक मुलगी आहे. नावाबद्दल बोलताना, दोघांनी अद्याप त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव उघड केलेले नाही. (Priyanka and nick Being Trolled For Welcoming Baby Via Surrogacy)

असे असले तरी, काहींना ही बातमी चांगली वाटली तर काहींना नाही आणि त्यांनी सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारणाऱ्या प्रियांका आणि निक यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या जोडप्याला ट्रोल देखील केले.

"मला अक्षरशः वाटले की ही घटस्फोटाची घोषणा आहे", "मला वाटले त्यांचे ब्रेकअप झाले." एका वापरकर्त्याने तिरस्कार करणाऱ्यांना फटकारले की, "निक जोनास आणि प्रियांका चोप्राने सरोगसीद्वारे बाळाला का जन्म दिला याने काही फरक पडत नाही आणि ते तुमच्या कामाचे नाही!!! त्यांना एक मूल झाले आणि तेच महत्त्वाचे आहे! एवढेच धन्यवाद."

पुढच्या एका व्यक्तीने, "लोक विनाकारण खवळलेले का आहेत, ती 40 च्या जवळ आहे, बहुधा तिला काही medical complications असू शकते किंवा तिला स्ट्रेच मार्क्स नको होते." तर, दुसर्‍याने नमूद केले, "तिला स्ट्रेच मार्क्स नको होते आणि breastfeeding how does that work असा प्रश्न देखील विचारला आहे. एका वापरकर्त्याने पोस्ट केले, " या सर्व प्रत्युत्तरांनी मला दाखवले आहे की अशे अनेक लोक आहेत ज्यांना सरोगेट म्हणजे काय हे माहित नाही.

प्रियांका आणि निक यांचे 2018 साली लग्न झाले. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या ३ वर्षानंतर या जोडप्याने सरोगेटद्वारे आपल्या बाळाचे स्वागत केले. प्रियंकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली.

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर निक जोनासला टॅग करत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'आम्हाला हे कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो, कारण आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. सर्वांचे आभार' असं प्रियंका म्हणाली आहे.

अभिनेत्रीने ही चांगली बातमी जाहीर केल्याने बहुतेक सोशल मीडिया वापरकर्ते आनंदित झाले होते, तर काहींनी सरोगसीचा पर्याय निवडल्याबद्दल तिच्यावर टीका देखील केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com