AI Impact Jobs Saam Tv
देश विदेश

टेन्शन वाढलं! नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?

AI Impact Jobs: इराण- अमेरिका युद्धामुळे मोठं संकट निर्माण झाले आहे. नोकऱ्यांवर एआय आणि युद्धाचं सावट आहे. ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट...

Priya More

Summary -

  • एआयमुळे जगभरात नोकऱ्यांवर संकट

  • Oracle कडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात

  • 2035 पर्यंत भारतात 30 लाख नोकऱ्यांवर धोका

  • युद्ध आणि आर्थिक अस्थिरतेमुळे परिस्थिती गंभीर

रोहित कदम, साम टीव्ही

एकीकडे इराण-अमेरिका युद्धामुळे अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं असताना एआयमुळे जगातील बड्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली ओरॅकल कंपनीनं भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. याच पार्श्वभूमीवर एआयमुळे भारतातील नोकऱ्यांवर कसा परिणाम होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

एआयमुळे जगभरातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. जगातील दिग्गज टेक कंपनी असलेल्या ओरॅकलने तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवून दिलीय. 'हा तुमचा शेवटचा कामाचा दिवस' असे सांगत ओरॅकल कंपनीने जगभरातील आपल्या 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यात भारतातील 12 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. युद्धाची पार्श्नभूमी पाहता सप्टेंबरमध्ये येणारं संकट आताच दाराशी आल्यानं नोकरदार वर्ग हवालदिल झालंय. नॅशनल फाउंडेशन फॉर एज्युकेशनल रिसर्च (NFER) च्या एका नवीन अहवालानुसार, एआय आणि ऑटोमेशनच्या एकत्रित वापरामुळे 2035 पर्यंत देशात 30 लाखजणांना नोकरी गमवावी लागणार आहे.

भारतातील कोण-कोणत्या क्षेत्रांवर किती परिणाम होणार आहे पाहूयात...

1. डेटा इन्ट्री ऑपरेटर्स - 85%

2. कॉल सेंटर एजंट्स - 80%

3. लोन प्रोसेसिंग ऑफिसर्स - 75%

4. ज्युनियर डेव्हलपर्स - 67%

5. सेल्स रिप्रेझेंटेटिव्हस - 67%

6. कॉपीरायटर्स - 60%

7. मार्केट रिसर्च अनालिस्ट्स - 53%

8. अकाऊंटिंग क्लर्क - 50%

एकीकडे इराण-अमेरिका युद्धाने अर्थव्यवस्था पोखरली जातेय तर दुसरीकडे एआय कार्यपद्धतीमुळे जगभरातील नोकऱ्यांना कात्री लागतेय. अशावेळी एआयचा वापर करून कंपन्या कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेत आहेत. एव्हंढच नाही तर एआयच्या वाढत्या वापरामुळे नोकरीची कुठलीही हमी राहिलेली नाही, हेच ओरॅकल कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. इतकं मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत काय? वाचा सविस्तर

रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का; सरपंचपदाच्या निवडणुकीत सख्ख्या भावाचा दारुण पराभव

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

Genelia Deshmukh-Raja Shivaji : जिनिलिया देशमुख ते सायली संजीव, कोण कोणत्या अभिनेत्रींनी साकारली महाराणी सईबाईंची भूमिका?

पुणेकरांसाठी Good News! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी होणार सुरू, १२ स्थानकांची नावेही समोर, वाचा

SCROLL FOR NEXT