Jharkhand Latehar truck accident seven people killed saam tv
देश विदेश

स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भीषण अपघात; अनियंत्रित ट्रकची टेम्पो आणि दुचाकीला जोरदार धडक, ७ जण ठार

Jharkhand Road Accident: झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात लुकुईया घाटात भीषण रस्ते अपघात झाला. अनियंत्रित ट्रकने टेम्पो आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाला.

Bharat Jadhav

  • झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील लुकुईया घाटात हा भीषण अपघात झाला.

  • अनियंत्रित झालेल्या ट्रकने मोटारसायकल आणि टेम्पोला जोरदार धडक दिली.

  • माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील एका भीषण रस्ते अपघातात ७ जण ठार झालेत. अनियंत्रित झालेल्या एका ट्रकने मोटारसायकलस्वार आणि टेम्पोला उडवलं असून या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात लुकुईया घाटात संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडला. अनियंत्रित ट्रकनं दुचाकी आणि टेम्पोला चिरडलं.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवणयात येत आहे. अशीच दुर्घटना कोडरमामधील सतगावात घडला होता. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास सतगावामधील गया-देवघर मुख्य मार्गावरील पोखर्डीहा वळणाजवळ, 'कांवरिया' (कांवर यात्रा करणारे भाविक) घेऊन जाणाऱ्या बसची एका ट्रकशी जोरदार धडक झाली.

या अपघातात एका निष्पाप मुलासह तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच सतगावाचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) बबलू कुमार सिंह पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तिरंगा बाईक रॅली; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल मोटरसायकलवर स्वार

मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला; भाजप नेत्याचं मिश्किल वक्तव्य

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार; १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल

Weight Loss Tips: एका महिलेने 'हे' ७ पदार्थ खाणं बंद करुन ४० किलो वजन केले कमी, तुम्हीही रोज खाता का?

IAS तुकाराम मुढेंना राजकारणात यायचंय? FDAच्या आयुक्तांनीच दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT