ओव्हरटेक करताना कार ट्रकला धडकली; देवदर्शनाला निघालेल्या ४ जणांचा करुण अंत

Four People Killed In Car Accident On Delhi Mumbai Expressway Near Shivgarh: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शिवगढजवळ भीषण अपघात झाला. खाटू श्याम दर्शनासाठी निघालेल्या कारची उभ्या ट्रकला धडक बसून चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले.
Four people killed in car accident on Delhi Mumbai Expressway near Shivgarh
Four people killed in car accident on Delhi Mumbai Expressway near Shivgarhsaam tv
Published On

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शिवगढजवळ भीषण अपघात झाला. शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री राजस्थानमधील खाटू श्यामच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाची कार थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलांसह पाच ज्न गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झाला. कोटाच्या दिशेने जाणारी अर्टीगा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील बाजूला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमधील प्रवासी गंभीर जखमी होऊन वाहनातच अडकले होते.

Four people killed in car accident on Delhi Mumbai Expressway near Shivgarh
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच शिवगढ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमीना उपचारासाठी रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. हे सर्वजण नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. ते खाटू श्यामच्या दर्शनासाठी निघाले होते. या दुर्घटनेत तीन महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या पाच जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. हे सर्वजण इंदौर, धार आणि झाबूआ जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Four people killed in car accident on Delhi Mumbai Expressway near Shivgarh
Samruddhi Mahamarg : मुलीला पुण्याला MBA ला सोडलं, निरोप दिला अन्...; समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील शिवगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, मृतांचे मृतदेह वाहनातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्वजण आपापसांत नातेवाईक आहेत. या प्रकरणाचा तपास शिवगढ पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com