

समृद्धी महामार्गावर ट्रक आणि कारला भीषण अपघात
वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री घडली घटना
अपघातामध्य सहा जणांचा जागीच मृत्यू
विरूळ इंटरचेंजजवळ हा भीषण अपघात झाला
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने कारला पाठीमागू जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. कारमध्ये असणारे चौघे आणि ट्रकमध्ये असणारे दोघे गंभीर जखमी झाले. या सर्वांनी जागीच प्राण सोडले. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धामध्ये समृद्धी महामार्गांवर भीषण अपघात झाला. कारला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. पुलगांव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विरूळ इंटरचेंजजवळ ही अपघाताची घटना घडली. पुण्यावरून मुलीचे अॅडमिशन करून नागपूरला जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. कारमधील चालकासह तिघांचा मृत्यू झाला. तर ट्रॅकमधील चालक आणी क्लीनरचाही अपघातामध्ये मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गांवर रात्री दरम्यान इथेनॉलचा एक ट्रक पलटी झाला होता म्हणून वाहतूक डायवर्ट केली होती. त्यात वाहतूक थांबली असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रॅकच्या खाली चिरडली गेली आणि ट्रकला आग लागली. ट्रक मिरची घेऊन जात होता. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आणि ट्रक जळून खाक झाला.
या अपघातानंतर मध्यरात्रीपासून समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. समृद्धी महामार्ग पोलिस आणि पूलगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.