जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दछन परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित एक गट लपल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरक्षा दलातील जवानांनी परिसराला वेढा घातला आहे आणि दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
गुप्त माहितीच्या आधारे, किश्तवाडमधील दछन आणि नागसेनी दरम्यान असलेल्या खानकू जंगलात पोलीस आणि सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरु झाले, त्या वेळेस ही चकमक सुरु झाली. शोध मोहिम सुरु असताना जंगलामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांना पाहताच गोळीबार सुरु केला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलातील जवानांनी अचूक प्रत्युत्तर दिले. ही चकमक काही काळ चालली. या गोळीबारामध्ये कोणी जखमी झाल्याचे किंवा कोणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून अजूनही कारवाई सुरु आहे. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेराव घालून पकडण्याचा किंवा त्यांना निष्क्रिय करण्याचा सैन्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
किश्तवाडमधील चकमकीच्या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी १९ जुलै रोजी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील काउंटर-इंटेलिजन्स शाखेने दहशतवादी निधी आणि भरती मॉड्यूलशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरणात महत्त्वाची कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी श्रीनगर, बडगाम, पुलवामा आणि गंदरबल जिल्ह्यांतून १० जणांना ताब्यात घेण्यात आले. भारतात दहशतवादी कारवायांचे समन्वय, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणी करण्याचा आरोप या १० जणांवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.