
अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
मागील काही वर्षांमध्ये पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देणे अशा गोष्टी पुण्यात दररोज घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील भवानी पेठ परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भवानी पेठ परिसरात पुन्हा एकदा कोयताधारी तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. किरकोळ भांडणाच्या पार्श्वभूमीवर तरुणाचा घोळका एकत्र आला. या तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेऊन शक्तीप्रदर्शन केले, लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीती व्यक्त केली जात आहे.
या तरुणांनी कोयते, तलवारी घेऊन फक्त लोकांना घाबरवले नाही, तर परिसरातील जवळपास १० ते १२ वाहनांची तोडफोड देखील केली. या तरुणांनी 'आम्हीच इथेल भाई, आमच्या नादी कोणी लागू नये' असा इशारा देखील दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत.
पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असल्याचे राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सांगितले. साम टीव्हीच्या खास मुलाखतीत ते बोलत होते. पुण्यात कोयता गँग सक्रीय नाहीये. गुन्हेगार लहान मुलांना २००-३०० रुपये देऊन, हातात कोयता देऊन दमदाटी करायला लावतात. या घटना घडू नये यासाठी पुण्यातील पोलिसांचे संख्याबळ वाढवले जाणार आहे. गुन्हेगारीला रोखण्यासाठी सरकार सर्वपरी प्रयत्न करत असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.