Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

Mira Road Crime : मीरा रोडमध्ये राहणाऱ्या एका पायलटच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका एअर हॉस्टेसने पायलटवर बलात्काराचा आरोप केला आहे.
Mira Road Crime News
Mira Road Crime Newsx
Published On

Mira Road News : मीरा रोडमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मीरा रोड येथील एका खासगी एअरलाइनमध्ये काम करणाऱ्या पायलटच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय एअर हॉस्टेसने या पायलटवर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर हॉस्टेस आणि पायलट यांनी काही दिवसांपूर्वी लंडनला जाणाऱ्या विमानाने एकत्र प्रवास केला होता. ते दोघे मीरा रोडमध्ये राहत होते. मुंबईला परतल्यानंतर आपण एकाच परिसरात राहतो हे दोघांना समजले. जवळ राहत असल्याने ते दोघे मीरा रोडपर्यंत एकत्र प्रवास करु लागले. या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला.

Mira Road Crime News
Video Viral : '...नाहीतर निघा बाहेर!' मुंबई लोकलमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद टोकाला, ट्रेनच्या डब्यात महिलांमध्ये जुंपली

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी पायलटने तरुणीला त्याच्या घरी येण्यासाठी आग्रह केला. एअर हॉस्टेस तरुणी पायलटच्या घरी गेली. दोघांनी घरात प्रवेश केल्यानंतर घरात कुणीही नसल्याचे पीडित तरुणीच्या लक्षात आले. एकटी असल्याचा फायदा उचलून आरोपीने पीडितेवर जबरदस्ती केली, तिच्यावर बलात्कार केला.

Mira Road Crime News
Maharashtra Politics : रमी खेळत नव्हतोच, राजकीय राड्यानंतर कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडिओवर कोकाटे काय म्हणाले?

पायलटने सुरुवातीला एअर हॉस्टेसचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिला एकटीला स्वत:च्या मीरा रोडमधील घरी आणले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर एअर हॉस्टेस तरुणीने पायलटच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली. नवघर पोलीस ठाण्यामध्ये पायलटच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पायलट सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Mira Road Crime News
Shocking Accident : लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अपघात, प्रसिद्ध गायिकेचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, उंचावरुन खाली पडणार इतक्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com