युद्ध जवळजवळ संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, तिसरे महायुद्ध टळले? VIDEO

Donald Trump Statement On Iran War Ending: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध जवळपास संपल्याचा दावा केला आहे. जागतिक तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केल्यास इराणला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत मोठे विधान केले आहे. इराणसोबतचे युद्ध आता जवळजवळ संपत आले असल्याचे त्यांनी सांगितलंय. तसेच जागतिक तेल पुरवठा कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असेही ट्रम्प म्हणालेत. इराणने तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. अशा कृतीसाठी इराणला यापेक्षाही कठोर शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. तसेच अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलो आहोत. इराणचे वायु दल आणि सैन्य दल आम्ही उद्ध्वस्त केले असून अण्वस्त्र निर्माण करणारा कारखाना देखील आम्ही उधळून लावला आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com