ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाल्यावर बाजारात कच्च्या कैऱ्या मिळायला सुरुवात होते. कच्च्या कैऱ्यांपासून तुम्ही अनेक चटपटीत पदार्थ बनवू शकता.
उन्हाळा सुरु झालयावर सर्वातआधी लोणचे बनवले जाते. कच्च्या कैरीचे लोणचे प्रत्येकालाच भरपूर आवडते.
कच्च्या कैरीला डाळीसोबत मिक्स करुन आंबट गोड चटपटीत चटणी बनवू शकता.
उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून गूळ मिक्स करुन आंबट गोड लोणचे बनवा. हे लोणचे तुम्ही नुसते देखील खाऊ शकता.
मसालेदार कच्च्या कैरीपासून पन्हं बनवा. हे केवळ एक चविष्ट पेय नसून, ते उष्णता आणि उन्हापासून संरक्षण देखील करते.
कच्च्या कैरीचे पातळ तुकडे करून त्यात लिंबू, मिरची आणि काकडी मिसळून स्वादिष्ट सॅलड तयार करा.
कच्ची कैरी उन्हात वाळवली जाते आणि वर्षभर साठवले जातात. कोणत्याही पदार्थात आंबट चव आणण्यासाठी या आंबट आंब्याच्या पावडरचा वापर केला जातो.