ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात शरीराला सतत काही तरी थंड पित राहावे असे वाटते. शरीराला थंडावा देण्यासाठी नारळ अननसाचे ड्रिंक बेस्ट मानले जाते.
हे ड्रिंक बनवण्यासाठी ताजा अननसाचा रस, नारळ पाणी, साखर आणि बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
अननसाचा रस काढून घ्या आणि त्यातील अननसाचे लहान तुकडे काढून टाकण्यासाठी रस गाळून घ्या.
एका मोठ्या भांड्यात नारळ पाणी आणि अननसाचा रस मिक्स करुन घ्या.
चवीनुसार त्यात साखर टाका आणि चांगले मिक्स करुन घ्या. जेणेकरुन साखर पूर्णपणे विरघळेल आणि चवही छान लागेल.
हे तयार केलेले मिश्रण एका ग्लासमध्ये बर्फांचे तुकडे घालून ओता.
आता वरुन ग्लासला अननसाच्या फोडी लावा किंवा नारळाच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.
तुमचे स्वादिष्ट आणि थंडगार नारळ अनानास ड्रिंक तयार आहे. लगेच पिण्याचा आनंद घ्या.