Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येतील, एकमेकांना मिठ्या मारतील; शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

Maharashtra : अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये आले. पक्षात फूट पाडून मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य शिंदसेनेतील नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

'आज जे चित्र दिसते आहे, ते उद्या दिसेलच असे नाही. आज राज आणि उद्धव ठाकरे यांचं जे चित्र पाहायला मिळत आहे, १९ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष देखील स्थापन केला. तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलत नव्हते, एकमेकांकडे साध बघत नव्हते, हसत नव्हते. पण ५ जुलैला दोघांनी एकमेकांना मिठी मारली', असे प्रताप सरनाईक म्हणाले.

Maharashtra Politics
Politics : महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

'ज्या प्रमाणे राज आणि उद्धव यांनी एकमेकांना मिठी मारली. असाच प्रसंग कदाचित भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडू शकतो. पण या क्षणासाठी वाट पाहावी लागेल. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो. राजकारणामध्ये काही सांगता येत नाही. भविष्यात ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र दिसू शकतात', असे संकेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

Maharashtra Politics
Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी (१९ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची बीकेसीमधील एका हॉटेलमध्ये आकस्मिक भेट झाली. या भेटीशी संबंधित काही प्रश्न प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आले. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भविष्यात एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य केले.

Maharashtra Politics
Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com