Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला २३ जुलै रोजी सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील दोन खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर पडले आहेत.
Ind Vs Eng 4th Test
Ind Vs Eng 4th Testx
Published On

Ind Vs Eng कसोटी मालिकेतील मँचेस्टर कसोटी बुधवारी (२३ जुलै) सुरु होणार आहे. कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. यामुळे संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. रिषभ पंत, अर्शदीप सिंह यांच्या पाठोपाठ आकाश दीप सुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे. अर्शदीप सिंह कसोटीतून बाहेर पडला आहे, तर आकाश दीपही सामना खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आकाश दीपने कमाल कामगिरी केली. लॉर्ड्स कसोटीदरम्यान त्याला पाठीचा त्रास सुरु झाला. कंबरेच्या दुखण्याने आकाश दीप त्रस्त झाला होता. याचा परिणाम तिसऱ्या कसोटीत आकाश दीपच्या खेळावर झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेणाऱ्या आकाश दीपने तिसऱ्या कसोटीत फक्त १ विकेट मिळवली होती.

Ind Vs Eng 4th Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहचे कसोटी क्रिकेट खेळणे, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे? पाहा धक्कादायक आकडे

जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजरमेंटमुळे मँचेस्टर कसोटी खेळणार नसल्याचे म्हटले जात होते. त्याच्या जागी अर्शदीप सिंहला खेळवले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण सरावसत्रादरम्यान अर्शदीपच्या डाव्या हाताला दुखापत झाली. आकाशदीप आणि अर्शदीप सिंह व्यतिरिक्त उपकर्णधार रिषभ पंत देखील जखमी आहे.

Ind Vs Eng 4th Test
Retirement : २०२६ टी-२० वर्ल्डकपपूर्वी संघाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

आकाशदीप आणि अर्शदीप सिंह चौथ्या कसोटीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हा सामना जसप्रीत बुमराहचे खेळणे निश्चित मानले जात आहे. या मालिकेमध्ये सध्या भारत १-२ च्या पिछाडीवर आहे. जर भारतीय संघाला मालिकेतील त्यांचे आव्हान टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना काहीही करुन मँचेस्टर कसोटी जिंकावी लागणार आहे.

Ind Vs Eng 4th Test
Cricket : २४ वर्षीय खेळाडूची कमाल, २२ चेंडूत ११० धावा... फक्त चौकार-षटकार मारत पठ्ठ्यानं ठोकलं शतक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com