जम्मू- काश्मिर|ता. १८ जुलै २०२४
गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी जम्मू- काश्मिरच्या डोडा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकचक झाली. यामध्ये चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता पुन्हा डोडामध्ये भारतीय जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असल्याचं समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात आज पहाटेपासून दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये पुन्हा चकमक सुरू झाली आहे. डोडा परिसरातील कास्तीगड भागात ही चकमक सुरू असून डोडामध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या कारवाईचा आज चौथा दिवस आहे. या भागामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाकडे आहे त्याच अनुषंगाने हे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात पहाटे 2 वाजता चकमक सुरू झाली. सुरूवातीला दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला ज्यानंतर प्रत्यूतरात भारतीय सैन्यानेही गोळीबार केला. शेवटचे वृत्त मिळेपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार सुरूच होता, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कठुआच्या बंदोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दुडू बसंतगड परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. ड्रोन आणि यूएव्हीची मदत घेतली जात आहे. स्पेशल फोर्सेसच्या जवानांनीही जंगलात पोझिशन घेतली आहे. सोमवारी, कठुआ हल्ल्यानंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोडामध्ये लष्कराच्या जवानांवर हल्ला केला ज्यामध्ये लष्कराच्या एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.