पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; आणखी एक शिलेदार शरद पवार गटाच्या वाटेवर? पाहा VIDEO
Ajit Pawar Sharad PawarSAAM TV

Maharashtra Politics : पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; आणखी एक शिलेदार शरद पवार गटाच्या वाटेवर? पाहा VIDEO

Maharashtra Political News : : पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा आणखी एक शिलेदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Published on

पुणे : पुण्यात शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याची तयारीत आहेत. पुण्यात आज माजी महापौरासहित शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर २४ तासांच्या आत अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादांचा आणखी एक शिलेदार दीपक मानकर शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार गटातील दीपक मानकर यांनी साथ सोडल्यास पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत दीपक मानकर शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. दीपक मानकर यांच्या भूमिकेमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दीपक मानकर यांच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत यांनी भाष्य केलं आहे. सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत म्हणाले, ' लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाचे काटे उलटे फिरु लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. या भागात अजित पवारांचं मोठं वजन आहे. तसेच या भागातील कार्यकर्त्यांवर अजित पवार यांचा मोठा प्रभाव आहे. यात नगसेवक आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र, आज काही सहकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेऊन पक्षात प्रवेश केला. आणखी काही माजी नगरसेवक शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे'.

'दीपक मानकर हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात. अजित पवारांसाठी त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. आता त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आहेत. त्यांनी कसबापेठ विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आहे. मध्यंतरी ते विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी शब्द दिला होता. मात्र, काही दिवसांत ही शक्यता मावळल्याची दिसू लागली. त्यामुळे ते आता पुढील काही दिवसांत शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सोयीचा आहे. त्यामुळे ते राजकीय सोयीसाठी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com