Pune Accident CCTV : थरारक! पुण्यात पुन्हा ड्रिंक & ड्राईव्हची घटना, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Pune Accident News : पुण्यात पुन्हा ड्रिंक & ड्राईव्हची घटना घडली आहे. भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
थरारक! पुण्यात पुन्हा ड्रिंक & ड्राईव्हची घटना, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Pune Accident CCTVSaam tv
Published On

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक & ड्राईव्हची घटना घडली आहे. पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाकडून दारुच्या नशेत अपघात झाला आहे. माजी नगरसेवकाच्या मुलाने दारुच्या नशेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक, क्लीनर जखमी झाले आहेत. तर माजी नगरसेवकाचा मुलगाही जखमी झाला आहे. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याच्याकडून दारुच्या नशेत अपघात झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत या मुलाने कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक दिली. या धडकेत ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर अपघातात माजी नगरसेवकाचा मुलगाही जखमी झाला आहे.

थरारक! पुण्यात पुन्हा ड्रिंक & ड्राईव्हची घटना, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Baramati Accident: भरधाव कारचा टायर फुटला, अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्तयावरील झेड कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली आहे. सौरभ गायकवाड हा कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्याचवेळी त्याच्याकडून दारुच्या नशेत त्याच्याकडून अपघात झाला. त्याने समोरून येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला धडक दिली.

या अपघात प्रकरणी पोलिसांनी सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सौरभ गायकवाड याने वडील बंडू गायकवाड हे सध्या शरद पवार गटात कार्यरत आहेत.

थरारक! पुण्यात पुन्हा ड्रिंक & ड्राईव्हची घटना, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Baramati Accident: भरधाव कारचा टायर फुटला, अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबईत भीषण अपघात

नवी मुंबईत भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नवी मुंबईच्या नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडवर अपघाताची घटना घडली. अशोक लीलँडचा मीनी टेम्पो उलटला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकून टेम्पो उलटला. या घटनेनंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com