देश विदेश

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं, भाजपचा थेट सत्तेचा दावा

Bharat Jadhav

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अर्टिकल ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच येथे मतदान झाले. निवडणुकीबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली होती. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.19 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यासाठी 24 जागांवर 219 उमेदवारांनी नशीब आजमावले आहे.

पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील २४ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. यात काश्मीर क्षेत्रातील 16 आणि जम्मू क्षेत्रातील 8 जागांचा समावेश होता. तर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा २५ सप्टेंबर तर तिसरा टप्पा ऑक्टोबर १ रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक राजकीय पक्ष आणि अपक्ष यांच्यासोबत रिंगणात रिंगणात असलेली चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत असली तरी राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक राजकीय पक्ष आणि अपक्ष रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत असली तरी राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, किश्तवारमध्ये सर्वाधिक 77.23 टक्के मतदान झाले. त्यानंतर दोडामध्ये 69.33 टक्के, रामबन (67.71 टक्के), कुलगाम (59.62 टक्के), शोपियान (53.64 टक्के) आणि अनंतनाग (54.17 टक्के) येथे मतदान झाले. पुलवामा येथे सर्वात कमी 43.87 टक्के मतदान झाले.

राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. अभियंता रशीद या नावाने प्रसिद्ध असलेले शेख अब्दुल रशीद यांना दिल्ली न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाल्याने त्यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने निवडणूक लढविल्याने निवडणुकीला आणखी वेळचं महत्त्व प्राप्त झाले होते.

रशीद यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि बारामुल्ला मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला होता. रशीदची जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी नेत्यांनी भाजपवर टीका केलीय.

भाजपला सत्तेची आशा

१० वर्षानतंर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान होत आहेत. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला.पहिल्या टप्प्यात मतदानावेळी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला. यानंतर भाजपने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. रामबन विधानसभा मतदारसंघातील हरितीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार राकेश ठाकूर यांनी सोमवारी मतदान केले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात बरीच विकासात्मक कामे झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत त्या घडामोडींसह भाजपने जम्मू-काश्मीरमधील मतदारांपर्यंत पोहोचल्याचं ठाकूर म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT