Jammu-Kashmir Election : १० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांची गर्दी

Jammu-Kashmir Assembly Election 2024: जम्मू -काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मदनाला सुरूवात झाली असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Jammu-Kashmir Election : १० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान, २४ हजार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
Jammu-Kashmir Assembly Election 2024Saam Tv
Published On

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जम्मूमधील ८ आणि काश्मीरमधील १६ म्हणजेच एकूण २४ जागांसाठी हे मतदान होत आहे. मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा, माजी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह महिला नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान होत आहे. ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ७ जिल्ह्यातील मतदार आज १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करत आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० लागू झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांचाद विधानसभा निवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २४ जागांवर मतदान होत आहे. यामध्ये पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनापोरा, शोपियान, डीएस पोरा, कुलगाम, देवसर, डुरू, कोकेरनाग, अनंतनाम पश्चिम, अनंतनाम, श्रीगुफ्वाडा -बिजबेहारा, शंगुस-अनंतनाग पूर्व, पहलगाम, इंदरवाल, किश्तवाड, पेद्दर नागसेनी, भदेरवाह, डोडा, डोवा पश्चिम, रंभा आणि बनिहाल या जागांचा समावेश आहे.

Jammu-Kashmir Election : १० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान, २४ हजार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
Jammu-Kashmir Election: पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान सुरु , स्थलांतरित काश्मिरी बजावणार मतदानाचा अधिकार

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज २३.२७ लाखांहून अधिक मतदार २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत आज सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. यामध्ये काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम आणि जम्मू विभागातील डोडा, रामबन आणि किश्तवार जिल्ह्यांचा समावेश आहे.

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप, पीडीपी यांची युती निवडणूक रिंगणात आहे. मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एनसीवर मतांच्या बदल्यात नोटा दिल्याचा आरोप केला आहे. कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. याआधी २०१४ मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे.

Jammu-Kashmir Election : १० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मतदान, २४ हजार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर आणि मागील ३ निवडणुका; 10 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेत कुणाची विकेट जाणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com